Girish Mahajan & Dinkar Patil Girish Mahajan & Dinkar Patil
उत्तर महाराष्ट्र

Dinkar Patil: भाजप, महापालिकेला घरचा आहेर; कुंभमेळ्याच्या कामात भ्रष्टाचाराचा सत्ताधारी नगरसेवकाचा आरोप!

Heavy rains wash away the quality of the work of Simhastha Kumbh Mela, the concrete-नागरिकांना मदत करताना नगरसेवक अमोल पाटील यांचा पाय मोडला, दिनकर पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला इशारा!

Sampat Devgire

BJP NMC News: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांबाबत गेले काही दिवस सातत्याने प्रशासनावर टीका होत होती. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाने ही टीका सार्थ ठरली आहे. नाशिक शहराची दुरावस्था झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. 

शहराच्या सातपूर भागात मोठ्या प्रमाणावर रस्ते खचले. अनेक ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे वाहतूक बंद पडली. रस्त्यावर मोठे खड्डे झाल्याने नागरिक त्यात पडून अपघात झाले.

शिवाजीनगर सातपूर येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात नागरिकांना मदतीसाठी भाजप नगरसेवक अमोल पाटील गेले होते. यावेळी त्यांचा पाय मोडला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी पोष्ट नगरसेवक दिनतर पाटील फेसबूकवर व्हायरल केली.

याबाबत भाजपचे नगरसेवक पाटील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैर कारभार सुरू आहे. त्यासाठी महापालिका अधिकारी कंत्राटदारांना निकृष्ट कामांसाठी मदत करीत आहेत. त्यामुळे शहराची गैरसोय झाल्याने याबाबत प्रशासनाला धडा शिकवू असा इशारा नगरसेवक पाटील यांनी दिला. त्यामुळे भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. 

नाशिक शहरात अनेक ठिकाणी प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन समोर चार रस्त्यावर तीन फूट पाणी साचले होते. त्यामुळे अनेक वाहने पाण्यात अडकली. 

वसंतराव कानिटकर उद्यानासमोरील रस्ता, नागपूर रोड, पाथर्डी फाटा, अंबड लिंक रोड, त्रंबक रस्त्यावरील पिंपळगाव बहुला येथील पूल पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनेक कामांचे काँक्रीट पावसाने वाहून गेले. रस्ते व अन्य बांधकामांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या कामांच्या गुणवत्तेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 

महापालिका आयुक्तांसह महापौर आणि उपमहापौरांनी रस्त्यावर उतरून या कामांचे पाहणी केली. कंत्राटदारांच्या चुकांमुळे नागरिकांना फटका बसला, अशी तक्रार महापौरांनी केली. याबाबत तातडीने परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नाशिकला ढगफुटी होईल असा इशारा दिला होता. ढगफुटीचे संकट टळले. मात्र मंगळवारी रात्रभर झालेल्या पावसाने सगळीकडे हाहाकार पसरला. याच्या ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनावर व सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवर आपला राग व्यक्त केला.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT