Heena Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Heena Gavit Join BJP : तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष लढल्या, हिना गावित यांची आता पुन्हा भाजपमध्ये घरवापसी

Heena Gavit joins BJP, Nandurbar politics : विधानसभेला तिकीट मिळालं नाही म्हणून हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. भाजपने त्यानंतर त्यांची हकालपट्टी केली होती. त्या आता पुन्हा भाजपत प्रवेश करत आहे.

Ganesh Sonawane

Nandurbar politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्षात बंडखोरी केलेल्या नेत्यांना भाजपकडून पुन्हा जवळ साधत पक्षात प्रवेश दिला जातो आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसला राज्यभरात यश मिळताना दिसत असून मोठ्या प्रमाणात पक्षात इनकमिंग सुरु आहे. अशातच आता नंदुरबारमध्येही भाजपची ताकद वाढणार आहे, कारण माजी खासदार हिना गावित घर वापसी करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अक्कलकुवा अक्राणी विधानसभेतून अपक्ष उमेदवारी केली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपने पुन्हा त्यांच्यासाठी पक्षाची दारे खुली केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हिना गावित यांचा आजच भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. हिना गावित यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. त्यामुळे नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे.

माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबारचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या त्या कन्या असून त्यांच्या पुन्हा घर वापसीमुळे जिल्ह्यात भाजपला आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये मोठा फायदा होईल अशी चर्चा आहे. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपला नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात मोठं करण्यामध्ये गावित कुटुंबीयांचे मोठं योगदान आहे.

२०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर खासदार झालेल्या गावित यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, पक्ष त्यांची हकालपट्टी करण्याच्या मार्गावर असताना त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.

गोवाल पाडवींनी केला होता पराभव

हिना गावित यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मदत न करता काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने त्यांचा पराभव झाला. त्यानंतर विधानसभा जागा वाटपाच्या वादात अक्कलकुवा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला, त्यामुळे डॉ. गावित यांनी आपला राजीनामा दिला होता.

आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता आणि उत्तर महाराष्ट्रातील गावित कुटुंबाचे राजकीय वजन लक्षात घेऊन त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT