Heramb Kulkarni - Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Heramb Kulkarni Attack News : हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालूनही 'ती' टपरी एका गाळ्यात सुरू

Ahmednagar Political News : मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊन दोन आठवडे होत नाही, तोच...

Deepak Kulkarni

Ahmednagar News : सामाजिक कार्यकर्ते मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर ज्या कारणातून हल्ला झाला होता, ती पान टपरी सीताराम सारडा विद्यालयाच्या 100 मीटर आवारात पुन्हा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लक्ष घातले होते. ही टपरी आता एका गाळ्यात सुरू झाली आहे.

मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊन दोन आठवडे होत नाहीत, तोच पुन्हा शाळेच्या आवारात राजरोसपणे धंदा सुरू झाल्यामुळे शहर जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली आहे.

शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्याची मागणीसाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन कारवाईची मागणी केली. प्रशासन पुन्हा हत्याकांड होण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल काळे यांनी प्रशासनाला या वेळी केला आहे.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सुरू असणाऱ्या पानाच्या गाळ्याचा व्हिडिओ दाखवण्यात आला. तसेच शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाच्या अध्यादेशाची प्रत देऊन लक्ष वेधण्यात आले. तातडीने कारवाईची मागणी काँग्रेसने केली. 'नगर शहरातील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवकांचे भवितव्य मटका, बिंगो, जुगार, तंबाखू, गुटखा, मावा अशा व्यसनाभोवती अडकविले जात आहे.

सरकार स्वतः अध्यादेश काढून गंभीर नाही. मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) या प्रकरणी लक्ष घालण्याचा केवळ दिखावा केला. मात्र, प्रत्यक्षात पुन्हा जैसे-थे परिस्थिती आहे. यामुळे पालकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. कुणालाही आपले पाल्य हे व्यसनाधीन, जुगारी व्हावेत असे वाटत नाही', अशी प्रतिक्रिया किरण काळे यांनी या वेळी दिली.

शाळा परिसरातील अवैध धंद्यांवर पुढील 48 तासांच्या आत कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने(Congress) केली आहे. कारवाई न झाल्यास सोमवारी पालकमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने ढोल बाजाओ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किरण काळे यांनी दिला.

यावरदेखील प्रश्न सुटला नाही, तर मात्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर मुंबई येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे. दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, सुनील क्षेत्रे, विलास उबाळे, अलतमश जरीवाला, रतिलाल भंडारी, गणेश चव्हाण निवेदन देताना उपस्थित होते.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT