Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात गुप्त बैठक, आमदार अपात्रतेबाबत चर्चा!

Mla Disqualification Case : राज्यात येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
Rahul Narvekar and Eknath Shinde
Rahul Narvekar and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त करत फटकारलं आहे. या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडल्याचे आज समोर आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

Rahul Narvekar and Eknath Shinde
Raj Thackeray News : इंजिनाच्या वाफेचे नाही चटके बसलेना यांना, बघाच तुम्ही; राज यांचा सत्ताधाऱ्यांना गर्भित इशारा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही गुप्त बैठक झाली. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने तंबी दिल्यानंतर पुढील पावलं काय उचलायची, यासंदर्भात या बैठकीत खल झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, मतदारसंघातील कामांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नार्वेकर पर्सनल लॉ चालवत आहेत - संजय राऊत

'घटनेची मोडतोड करून मनमानी पद्धतीने निर्णय घ्यायचा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कायद्याचं पुस्तक मानत नाहीत. ते स्वतःचा पर्सनल लॉ चालव आहेत. पर्सनल लॉवर हा देश किंवा राज्य चालणार नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली

आहे.

या सरकारची तिरडी तयार आहे - वडेट्टीवार

सगळा महाराष्ट्र बघतोय, जाण्याची वेळ आली आहे यांची. आता काय पालकमंत्री घेऊन बसलात. अध्यक्षांच्या कृपेने काही काळ आजचं मरण उद्यावर आणि उद्याचं परवावर, असं चाललं आहे. तिरडी तयार आहे. फक्त ती कधी काढायची, हे अध्यक्ष ढकलताहेत दिवस. पेशंट गेलेला आहे, पण व्हेंटिलेटरवर जिवंत ठेवलेला आहे. अध्यक्षांच्या कृपेमुळे आणि हे व्हेंटिलेटर काढलं की तो मेला अशी परिस्थिती होणार, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

'विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी'

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक सादर करावं आणि त्यात हे प्रकरण कधी संपणार हे स्पष्ट करावं. ही त्यांना शेवटची संधी. या प्रकरणी आता ३० ऑक्टोबरला पुढील सुनावणी होईल. या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात सुधारित वेळापत्रक सादर न झाल्यास आम्हीच वेळापत्रक ठरवून देऊ, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता काय पुढे काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Rahul Narvekar and Eknath Shinde
Supreme Court News : ‘थातूरमातूर कारणं देऊ नका; हे प्रकरण कुठल्या दिवशी संपणार, हे स्पष्ट सांगा': कोर्टाने म्हटल्याचा शिवसेनेचा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com