Dilip Bankar & Anil Kadam
Dilip Bankar & Anil Kadam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pimpalgaon APMC News; आमदार दिलीप बनकर यांना अनिल कदम यांचा दे धक्का!

Sampat Devgire

Pimpalgaon Baswant News : (Niphad) येथील बाजार समितीची (APMC) निवडणूक (Election) अतिशय अटीतटीची होणार असून त्याची राज्यभर चर्चा आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांच्यात सरळ लढत आहे. त्यात बनकर समर्थकांच्या 78 मतदारांची नावे वगळण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पॅनेल निर्मितीच्या आधीच कदम यांनी बनकर यांना धक्का दिला आहे. (MLA Dilip Bankar`s followers 78 voters name will be skip from list)

आमदार बनकर यांनी तालुक्यात या सहा विविध कार्यकारी सहकारी संस्थांना मंजुरी मिळवली होती. तेव्हापासून बनकर आणि कदम यांच्यात या विषयावर वाद सुरु होता. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. त्यात या संस्थांच्या 78 संचालकांची नावे मतदार यादीतून वगळण्यास जिल्हा उपनिबंधकांनी स्थगिती दिली आहे. ती कायम ठेवण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे बनकर यांची हक्काची 78 मते यादीतून वगळण्यात येणार आहे. हा बनकर यांना धक्का मानला जातो.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या निवडणूक मतदार यादीतून ७८ संचालकांची नावे वगळण्याच्या शासन व जिल्हा निबंधकांनी दिलेल्या निर्णयाला दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. ती मागे घेण्याचा निर्णय गुरुवारी दिला. त्यामुळे मतदारयादीतून ‘त्या’ सहा सोसायटीच्या ७८ संचालकाची नावे अपात्र ठरविण्याचा शासन निर्णय कायम राहिला आहे.

पुढील सुनावणी येत्या १० एप्रिलला होणार आहे. त्याकडे बनकर-कदम गटासह सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार दिलीप बनकर यांनी निर्माण केलेल्या सहा सोसायट्यांच्या ७८ संचालकांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा निर्णय शासन व जिल्हा निबंधकांनी दिला होता.

त्यावर आमदार बनकर यांनी दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली होती. गुरुवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने आपला दोन दिवसांपूर्वीचा निर्णय मागे घेत शासन निर्णयाचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे त्या ७८ संचालकांची नावे मतदार यादीतून बाद होणार आहेत. आता सोसायटी गटातील मतदारांची संख्या घटून ९३० एवढी झाली आहे. पुढील सुनावणी १० एप्रिलला होणार आहे.

दरम्यान, हाच निर्णय कायम राहिल्यास बनकर-कदम यांच्याकडून सोसायटीत गटात चर्चेत असलेली नावे पाहता लढत कमालीची चुरशीची होणार, यात शंका नाही. सध्या तरी विजय व पराजय फिफ्टी फिफ्टी असल्याने मतदारांची मात्र दिवाळी होणार हे नक्की आहे. पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. निवडणुकीचे चित्र कसे असेल याविषयी कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क लावले जात असले तरी अद्याप कोणत्याही गटाने अधिकृत पॅनलची घोषणा केलेली नाही. त्यामुळे माघारी अंती निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT