NCP Party Workers Complain: राष्ट्रवादी काँग्रेसने निष्ठा नसलेल्यांवर प्रेम करणे थांबावावे!

Jayant Patil News: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नाशिकच्या कार्यकर्त्यांनी घातली साद.
Hemant Takale, Jayant Patil & Sameer Bhujbal
Hemant Takale, Jayant Patil & Sameer BhujbalSarkarnama
Published on
Updated on

नाशिक (Nashik): विश्‍वासार्ह्यता अन पक्षावर निष्ठा नसलेल्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) प्रेम करणे थांबवावे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे, अशी साद राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना घालण्यात आली. (NCP party workers complain about party policy to Jayant Patil)

Hemant Takale, Jayant Patil & Sameer Bhujbal
Jayant Patil News : लाईट गेली तरी जयंत पाटील थांबले नाहीत; मोबाईल टॉर्चच्या उजेडात ठोकले भाषण!

विधानसभेच्या मागील विधानसभा निवडणुकीवेळी नाशिक पूर्व मतदारसंघातून आयत्या वेळचा उमेदवार देण्यात आला. तसेच आगामी निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा आणि आपले मतदारसंघ काँग्रेस अथवा शिवसेनेला सोडण्यात येवू नयेत, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

Hemant Takale, Jayant Patil & Sameer Bhujbal
Jayant Patil On Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी कायम राहावी, ही शरद पवार इच्छा!

राष्ट्रवादी भवन येथे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीचे. गजानन शेलार यांनी मध्य मतदारसंघ पक्षाला मिळावा आम्ही पक्षाला आमदार देऊ असा विश्‍वास व्यक्त केला. एवढेच नव्हे, तर आमच्यातील एक जण राष्ट्रवादीत, दुसरा काँग्रेसमध्ये, तिसरा शिवसेनेत, चौथा भाजपमध्ये अशी स्थिती नसून आम्ही राष्ट्रवादीमध्ये एकदिलाने आहोत, असेही त्यांनी सांगितले.

एरव्ही प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत पक्ष कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी हे सूत्र ठरलेलेच असते. मात्र कालच्या बैठकीत जयंत पाटील यांनी जळगाव, धुळे येथे कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावना, स्थानिक राजकारण यामुळे स्थानिकांच्या आग्रहाच्या जोडीला काही संघटनात्मक बांधणीची चर्चा यावेळी झाली. बैठकीनंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Hemant Takale, Jayant Patil & Sameer Bhujbal
Pune News : तब्बल 19 वर्षानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर; पण पुन्हा न्यायालयाच्या कचाट्यात अडकणार?

‘एक तास राष्ट्रवादीसाठी'

केंद्र व राज्य सरकारची एकाधिकारशाही, महागाई, बेरोजगारी, कांद्याला भाव न मिळणे असे गंभीर प्रश्‍न तयार झाले असल्याने भाजपविरोधी वातावरण तयार झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे दिल्लीमधील भाषण यामुळे विरोधकांसाठी चांगली संधी मिळाली आहे, असे सांगून प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, की कुठलाही विधानसभा मतदारसंघ मागत असताना सभासद नोंदणी आणि बूथ समित्यांची रचना महत्त्वाची असते.

त्यामुळे मध्य मतदारसंघातील २ हजार ९४० बुथवरील सदस्यांना मतदारांची विभागणी करून देत ‘पर्सनल टच' वाढवावा. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी ‘एक तास राष्ट्रवादी काँग्रेस'साठी राबवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम प्रत्येक बुथवर राबवावा. त्यावेळी स्थानिकपासून ते दिल्लीपर्यंतच्या प्रश्‍नांची चर्चा करत पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडावी.

Hemant Takale, Jayant Patil & Sameer Bhujbal
Jitendra Awhad Tweet: आव्हाडांचं सूचक Tweet ; मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार, जेलमध्ये सडवणार, मी तीन वर्ष अनुभवतोयं..

धनंजय मुंडेंवर जबाबदारी

बूथ समित्यांच्या रचनांची जबाबदारी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर मराठवाडा, नाशिक आणि नगरची देण्यात आली आहे. ते यासंबंधाने सविस्तर माहिती देतील. पण आगामी विधानसभा निवडणुका वर्षभरावर असल्याने भरपूर वेळ असल्याने घराघरांत सभासद नोंदणी करावी. त्याचबरोबर आता ‘सायकॉलीजकल' लढाई असल्याने पक्षाचे सभासद वाढवावेत. राज्यभर महाविकास आघाडीचे मेळावे होणार आहेत. त्यातील एक मेळावा ३ जूनला नाशिकमध्ये होईल, असेही श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार हेमंत टकले, जयवंतराव जाधव, आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार देविदास पिंगळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आहेर आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com