Sonia Gandhi, Mallikarjun Kharge, Nana Patole, Ashok Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Chavan Resignation : मोठी बातमी - काँग्रेससोबत किती आमदार? उद्या चित्र स्पष्ट होणार

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News :

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला 'हात' दाखवल्यानंतर काँग्रेस आता सावरली असली तरी अत्यंत सावध झाली आहे. ऐन राज्यसभा आणि नंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एकपाठोपाठ एक धक्के बसत आहे. आधी मिलिंद देवरा, त्यानंतर बाबा सिद्दीकी, काल काँग्रेसचे मुंबई जिल्हाध्यक्ष जगदीश अण्णा कुट्टी नंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे होत असलेले नुकसान पाहून आता थेट काँग्रेसच्या हायकमांडने महाराष्ट्रात लक्ष घातले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि सोनिया गांधींकडून (Sonia Gandhi) महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा वारंवार घेतला जात आहे.

अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) काँग्रेसला टाटा केल्यानंतर काँग्रेस सावध झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 'हात'घाईवर आले असून त्यांनी तातडीने उद्या (14 फेब्रुवारी) मुंबईत काँग्रेसची बैठक बोलावली आहे. यासाठी पटोलेंनी सर्व काँग्रेस आमदारांशी फोनाफोनी केली आहे.

राज्यसभेची निवडणूक गुरुवारी (15 फेब्रुवारी) होत आहे. ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेसची (Congress) पडझड सुरू झाली आहे. अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश काँग्रेसला किती डॅमेज करतो, याकडे काँग्रेसचे बारीक लक्ष आहे.

अशोक चव्हाण यांच्याबरोबर काँग्रेसमधील 10 ते 11 आमदारांची चर्चा आहे. अशा स्थितीत काँग्रेस स्वबळावर राज्यसभेत खासदार निवडून कसा आणणार, हाच खरा प्रश्न आहे. विधानसभेत 45 आमदारांपैकी काँग्रेससोबत किती, हे अजून स्पष्ट झालेले नाही. (Congress MLA)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप राज्यसभेसाठी (Rajyasabha) चार उमेदवार देत आहे. यात अशोक चव्हाण यांचाही समावेश असल्याचे आताचे चित्र आहे. हा भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी महाराष्ट्रावर फोकस केले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी महाराष्ट्रातील या घडामोडीवर भारत न्याय जोडो यात्रेत असलेल्या राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.

काँग्रेसचे दिल्लीतील नेते राज्यातील ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), नाना पटोले (Nana Patole), विजय वडेट्टीवार यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत. उद्याच्या बैठकीतून किती आमदार काँग्रेससोबत आहेत, याचा कानोसा घेतला जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक काँग्रेस आमदाराशी वरिष्ठ नेते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सातत्याने संपर्कात आहेत.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT