Maratha hunger strike Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Niphad Maratha News : जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी सरणावर बसून उपोषण

Sampat Devgire

Martha Reservation news : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या जालना येथील जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ निफाड येथे अनोखे आंदोलन सुरू आहे. येथील वाल्मीक बोरगुडे यांनी सरणावर बसून उपोषण सुरू केल्याने नागरिकांची गर्दी होत आहे. (Maratha community at Niphad given support to Jarange patil`s hunger strike)

या विषयाच्या (Maratha) अनुषंगाने जिल्ह्यात (Nashik) विविध भागात आंदोलन करण्यात येत आहे. अद्यापही या आंदोलनाची धग कायम आहे. नैताळे (निफाड) (Niphad) येथील उपोषण, आंदोलनदेखील त्या अनुषंगाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ येथील शेतकरी वाल्मीक बोरगुडे रविवारपासून सरणावर उपोषणाला बसले आहेत. त्यांचा उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

तीन दिवसांत जिल्हाभरातून पाच हजार कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन वाल्मीक बोरगुडे यांना पाठिंबा दर्शविला. जिल्ह्यातील विविध संघटना, ग्रामपंचायतींनी पाठिंबाचे पत्र दिले.

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप मोरे, यतिन पाटील-कदम, प्रणव पवार, रावसाहेब रायते, डॉ. रमेश वाळुंज, डॉ. सचिन ढेमसे, डॉ. दिलीप जाधव, डॉ. दिलीप कुमावत, डॉ. उत्तमराव डेर्ले, शिवा पाटील-ढोमसे, मनोज पानगव्हाणे, जान्हवी कदम, सोमनाथ मोरे, अरुण मोरे, सोपान खालकर, संदीप देवकर, दिनेश कोल्हे, अतुल सुरळकर, सादिकभाई शेख, कैलास काळे, आरपीआयच्या निफाड तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा मीराबाई छबू खरे, छबू खरे आदींनी भेटी दिल्या.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यभर गाजत आहे. त्यासाठी ठीकठिकाणी उपोषण, रस्ता रोको व आंदोलने केली जात आहे. येथे वाल्मीक बोरगुडे तीन दिवसांपासून उपोषण करीत आहेत. जिल्ह्यातील अनेकांनी भेटी दिल्या. मात्र, निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी उपोषणस्थळी भेट न दिल्याने मराठा समाज बांधवांनी नाराजी व्यक्त केली. जरांगे पाटील उपोषण सोडतील तेव्हाच आम्ही उपोषण सोडू, असे बोरगुडे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT