Nashik Shivsena News : बबनराव घोलप यांनी शिवसेनेत आपला खुंटा पक्का केला?

Uddhav Thackeray reject Babanrao Gholap`s resignation-पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा फेटाळल्याने घोलप यांचा राजीनामा ठरला पेल्यातील वादळ
Babanrao Gholap
Babanrao GholapSarkarnama
Published on
Updated on

Babanrao Gholap news : शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांनी दिलेला उपनेते पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल फेटाळला. त्यामुळे हा राजीनामा पेल्यातील राजकीय वादळ ठरला. यानिमित्ताने घोलप यांनी शिवसेनेतील आगामी राजकीय व्यवस्थेसाठी आपला खुंटा पक्का केल्याचे चित्र आहे. (Is Babanrao gholap clears his position for future politcs in Shivsena)

शिवसेनेचे (Shivsena) बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी लोकसभा संपर्क नेत्यांच्या नव्या नियुक्त्यांत डावलल्याने उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेटाळला आहे.

Babanrao Gholap
Eknath Shinde Jalgaon Daura: आता मुख्यमंत्री शिंदेंची बारी; पाचोऱ्यातून उद्धव ठाकरेंच्या बोचऱ्या टीकेला काय उत्तर देणार ?

घोलप हे शिर्डी (नगर) लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यातच या मतदारसंघात विविध राजकीय घडामोडी घडल्या. पक्ष सोडून गेलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात आला. तसेच लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क नेत्यांत बदल करण्यात आला.

या राजकीय घडामोडींनी माजी मंत्री घोलप यांची संभाव्य उमेदवारी असुरक्षित झाली होती. तसेच मतदारसंघातील राजकीय परिस्थिती बदलण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघात आपल्याला उमेदवारीचा शब्द पक्षप्रमुख ठाकरे यांनी दिल्याचा घोलप यांचा दावा होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला होता.

Babanrao Gholap
Shinde Group Vs Sanjay Raut : राऊतांची 'ती' टीका झोंबली, शिंदे गटाकडून जशास तसा पलटवार; "त्यांच्या तोंडाला 'एचआयव्ही'..."

शिवसेना उपनेते व शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. मात्र, हा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी नाकारला. दोन दिवसांनंतर पुन्हा यावर चर्चा होणार आहे. आपल्याला विश्वासात न घेता शिर्डीचे संपर्कप्रमुख म्हणून आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे बबनराव घोलप यांनी आपल्या शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींना पाठविला होता.

Babanrao Gholap
Nashik Shivsena news : ठाकरे गटाचे बबनराव घोलप यांचा उपनेते पदाचा राजीनामा

राजीनामानंतर चर्चेसाठी बबनराव घोलप यांना मुंबई येथे बोलविण्यात आले होते. त्यानुसार खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांची चर्चा झाली. घोलप यांचा राजीनामा न स्वीकारण्याची भूमिका पक्षनेत्यांची आहे, असे सांगण्यात आले. याबाबत दोन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन चर्चा होईल. या वेळी उत्तर नगरचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, भारत मोरे, संदीप आयनोर आदी नेते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com