Ramdas Athawale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ramdas Athawale; माझ्यामुळे भाजपला देशभरात फायदा झाला, शिर्डी मतदारसंघ हवा!

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणतात, माझ्यामुळे भाजपला देशभरात फायदा झाला आहे. यंदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार.

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) (RPI) पक्षामुळे भाजपला (BJP) देशभरात फायदा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे केंद्रात (Centre) मंत्रिपद तर राज्यातही (Maharashtra) विधानसभेसाठीच्या किमान १५ जागा व दोन मंत्रिपदे, एक महामंडळाची मागणी असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. (Ramdas Athawale claims BJP have political benifit due to RPI alliance)

गोल्फ क्लब येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्री. आठवले बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिर्डी (Shirdi) लोकसभा मतदार संघातून आपण स्वत: निवडणूक लढणार आहोत. त्या संदर्भात प्राथमिक चर्चा भाजपतील पदाधिकाऱ्यांशी झालेली आहे. या शिवाय राज्यात आणखी दोन जागा आपला पक्ष लढवेल, असा दावा केला.

ते म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचीच सत्ता येईल. राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत. विरोधकांतील प्रत्येक पक्षाकडे पंतप्रधानपदासाठी चेहरा असल्याचे श्री. आठवले म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत ५० जागा शिवसेनेला देणार असल्याचे वक्तव्य केल्याने सेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत मंत्री आठवले म्हणाले, ते त्यांचे मत असू शकते. महायुतीत जागा वाटपासंदर्भातील चर्चा होईल. त्यातून शिवसेनेची नाराजी दूर होईल.

गरज भासल्यास आपण पुढाकार घेऊ असेही ते म्हणाले. आरपीआय (आठवले गट) ताकद देशभरात असून त्याचा फायदा भाजपला वेळोवेळी झाला आहे. त्यामुळे आपल्याला केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे. येत्या लोकसभेमध्ये आपण शिर्डीतून लढणार असून त्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा झाली.

विधानसभेसाठी किमान १५ तर नाशिक महापालिकेसाठी २२ जागांची मागणी करणार आहोत. लोकसभेसाठी शिर्डीसह मुंबईतून एक आणि आणखी एका जागेची मागणी आहे. आगामी विधानसभेतही किमान पाच -सहा आमदार आपल्या पक्षाचे निवडून येतील, असा विश्‍वासही मंत्री आठवले यांनी व्यक्त केला.

शिर्डीत २८ मे रोजी अधिवेशन

शिर्डी येथे २८ मे रोजी आरपीआयचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री यांना अधिवेशनाचे निमंत्रण देणार आहे. अधिवेशनात राज्यातील लढायच्या जागा, सर्व जाती -धर्मांमधील व्यक्तींना उमेदवारी देण्यासह विविध विषयांवर मंथन होणार असल्याची माहिती ना. आठवले यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT