Ramdas Athawale; ‘सतत जे म्हणतात खोके त्यांचे फिरलय डोके’

रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मालेगावला रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama

मालेगाव : (Malegaon) भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी आम्हाला माणसाला माणसाशी जोडणारे, शांततेचे, अहंकार गाडून टाकणारे, विज्ञानवादी, प्रज्ञा, शील, करुणा, जाती व्यवस्था नष्ट करणारे व सर्व जाती, धर्मांना समान न्याय देणारे तत्वज्ञान शिकविले आहे. तेच आमचे तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे आम्हाला कोणीही राष्ट्रवाद (Nationalism) शिकवू नये असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले. (No one should teech nationalism to us, Says Ramdas Athawale)

Ramdas Athawale
Uddhav Thackeray; एकनाथ शिंदेंना दुसरा धक्का, शिवसैनिकांची घाऊक घरवापसी!

रिपब्लिकन पक्षाच्या स्वप्नपरी लॉन्समध्ये झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, मालेगाव विभाग जिल्हाध्यक्ष भारत जगताप, तालुकाध्यक्ष दिलीप अहिरे, शहराध्यक्ष विलास केदारे, दादा महाले, युवाध्यक्ष दिलीप शेजवळ आदी व्यासपीठावर होते.

Ramdas Athawale
Sanjay Raut; एकनाथ शिंदे गटाची हीच लायकी आहे!

श्री. आठवले म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श आहेत. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरुन आमची वाटचाल सुरु असल्याने गेल्या सात वर्षात देशात पक्ष वाढला. नागालँडमध्ये दोन जागांवर विजय मिळाला. चार जागांवर आम्ही दुसऱ्या क्रमांकावर होतो.

केंद्रशासित प्रदेशांसह सर्व राज्यात रिपब्लिकन पक्ष पोचला आहे. यासह आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण महात्मा फुले विकास महामंडळ व अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे सहाशे कोटी रुपये कर्ज माफ करावे अशी मागणी केलेली आहे.

Ramdas Athawale
Envirnment Alarm; राजकीय नेतृत्व केव्हा जागे होणार?...निसर्गाचे संकेत ओळखा!

दिलीप अहिरे, विश्‍वनाथ काळे, श्री. लोंढे, श्री. जगताप आदींची यावेळी भाषणे झाली. मेळाव्यास युवराज देवरे, विनायक वाघ, सुभाष अहिरे, आनंद खैरनार, सनी म्हसदे, किरण पगारे, राहुल पवार, रमेश मकासरे, गौतम सोनवणे, शीला गांगुर्डे, मोनाली जाधव आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते सभेला उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com