IAS Pooja Khedkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांनी 'यूपीएससी'ला देखील गंडवले; नावात बदल, 11 वेळा परीक्षा दिली

Pradeep Pendhare

IAS Pooja Khedkar News : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा सर्वात मोठा कारमाना समोर आला. परीक्षा देताना संघ लोक सेवा आयोगालाच (यूपीएससी) गंडवले दिसते.

पूजा खेडकर हिने 11 वेळा यूपीएससी परीक्षा दिली. ही परीक्षा देताना पूजा यांनी नावात बदल केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पूजा यांच्या अडचणीत वाढ झाली असून, कारवाई होण्याची शक्यता आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस (IAS) पूजा खेडकर यांचे यूपीएससी परीक्षाचे अटेम्प्ट संपले होते. परीक्षा देता यावी यासाठी त्यांनी नावात बदल करून परीक्षा दिली. पूजा खेडकर यांनी 11 वेळा यूपीएससी परीक्षा दिली.

2019-20 पर्यंत पूजा दिलीपराव या नावाने परीक्षा दिली. 2021-22 मध्ये त्यांनी नावात बदल केला. पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाने यूपीएससीची परीक्षा दिली. पूजा खेडकर यांच्या दोन्ही नावांच्या यूपीएससीमध्ये लिस्ट आहेत.

पूजा खेडकर यांनी यूपीएसी (UPSC) परीक्षा देताना 2019-20 पर्यंत वडिलांचे नाव दिलीपराव, असे लिहिले होते. त्या स्पेलिंगमध्ये डी डबल ई लिहिले. नावाची सुरवात अडनावापासून होत असते.

मात्र 2021 पासून त्यांनी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असे नाव यूपीएससी परीक्षे देताना द्यायला सुरवात केली. त्यांनी नावात आईचे नाव लिहायला सुरवात केली. वडिलांचे नाव दिलीप केले आणि त्यांचे स्पेलिंग देखील बदलले.

राज्य सरकारने 2024 मध्ये आईने नाव लावण्याचा निर्णय घेतला. मग पूजा खेडकर यांनी 2021 पासून आपल्या नावात आईच्या नावाचा समावेश केला. त्याअगोदर त्या आईचे नाव का वापरत नव्हत्या, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

पूजा खेडकर यांनी नावात केलेला बदल फक्त यूपीएससी अटेम्प्ट वाढवून मिळाव्यात यासाठी केल्याचा आरोप होत आहे. पूजा खेडकर यांचे यूपीएससीचे अटेम्प्ट संपल्याने ते देता यावेत, यासाठी नावात बदल केला.

नावात बदल केल्यानेच यूपीएससीच्या फिल्टरमध्ये त्या अडकल्या नाहीत. ओबीसी म्हणून पूजा खेडकर यांना 9 वेळा यूपीएससीची परीक्षा दिली होती. त्यांचे हे अटेम्प्ट 2019-20 मध्ये संपले असल्याचे समजते.

यावर बहुविकलांगत्वासाठी 2020 मध्ये कॅटकडे म्हणजेच, केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाकडे याचिका करत अटेम्प्ट वाढवून मिळवण्याची मागणी केली. तसेच एसटी आणि एनटी विद्यार्थ्यांप्रमाणं अमर्यादित संधी देण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. पण केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाने पूजा खेडकर यांची मागणीची याचिका फेटाळली.

अटेम्प्ट वाढवून मिळण्यासाठी खेडकर यांनी केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाकडे धाव घेतली होती. यानंतर 2021-22 मध्ये पूजा खेडकर यांनी यूपीएससीची परीक्षा दिली. ती कशी? अटेम्प्ट संपले नव्हते, तर मग त्यांनी कॅटकडे पिटिशन का दाखल केली, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

'यूपीएससी'चा अर्ज भरताना नाव लिहिण्याचा नियम काय

उमेदवाराने अर्जात त्याच्या दहावीच्या प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे नाव लिहावे. म्हणजेच मराठी व्यवस्थे प्रमाणे आडनाव , स्वतःचे नाव शेवटी वडिलांचे नाव. पूजा खेडकर यांनी 2019 पर्यंत याच पद्धतीने नाव लिहित यूपीएससीची परीक्षा दिल्याचे दिसते.

पण त्यांनी 2021 पासून नावामध्ये बदल करून आईचे नाव लावण्यास सुरूवात केली. त्यामुळे आता त्यांच्या प्रमाणपत्रांची देखील तपासणी होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, पूजा खेडकर यांची नोव्हेंबर 2021 मध्ये स्पोर्टस अथॅारटी ॲाफ इंडियाच्या सहायक संचालक पदावर निवड झाली. त्यातही त्यांनी खेडकर पूजा दिलीपराव, असेच नाव लिहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT