IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरच्या आई-वडिलांचा पोलिसांकडून शोध सुरू, फोन बंद असल्याचे गाठला बंगला

Police Manorama Khedkar Dilip Khedkar Pooja Khedkar : मुळशी तालुक्यातील धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. ती ताब्यात घेताना शेजारील शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी केला.
pune gramin police
pune gramin policesarkarnama
Published on
Updated on

Pune News : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे कारनामे समोर आले आहेत. मुळशीतील शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवण्याऱ्या पूजा खेडकरच्या आई आणि वडिलांच्या विरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याच गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस खेडकर कुटुंबीयांशी संपर्क साधत होते. मात्र, खेडकर कुटुंबाचे फोन बंद असून त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज (सोमवारी) पुणे ग्रामीण पोलिसांनी खेडकर कुटुंबीयांच्या पुण्यातील निवासस्थानी जात त्यांच्या शोध घेण्याचा प्रयत्न केला.

मुळशी तालुक्यातील धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. ती ताब्यात घेताना शेजारील शेतकऱ्यांच्या जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी केला. याला शेतकऱ्यांना विरोध केला तेव्हा मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन तिथे पोहोचल्या. मनोरमा खेडकर यांनी हातात बंदुक घेऊन शेतकऱ्यांना धमकाविले.

याबाबत संबधित शेतकऱ्यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पण, त्यावेळी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. याबाबतच्या बातम्या प्रसारमाध्यमात आल्यानंतर शुक्रवारी (ता.12) संध्यकाळी पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पूजा खेडकर Pooja Khedkar यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (65 वर्षे रा. मु पो केडगाव (आंबेगाव पुनवर्सन ) ता.दौड जि. पुणे) यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

pune gramin police
Supriya Sule : 'एक कायम लक्षात ठेव, बारामती...', संसदेत जाताना सुप्रिया सुळेंना येते शरद पवारांच्या सल्ल्याची आठवण

याच गुन्ह्याच्या तपासासाठी खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून Police शोध सुरु करण्यात आला आहे. मात्र खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याच पुणे पोलिसांन कडून सांगण्यात येत आहे. खेडकर कुटुंब आणि त्यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार केली आहेत.

पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय. या सर्वांचे मोबाईल फोन देखील स्वीच ऑफ असल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे. पुणे पोलिसांनी रविवारी (ता.14) खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर भागातील बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगल्याचे गेट बंद असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचे चित्रीकरण केले आहे.

(Edited By Roshan More)

pune gramin police
Sharad Pawar-Chhagan Bhujbal : शरद पवार-भुजबळ भेटीवर अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया; ‘भुजबळांना तरी परवानगीची गरज नाही...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com