नाशिक : राज्याचे (Mahavikas Aghadi) अर्थमंत्री व ऊर्जामंत्री यांच्यात आपसांत भांडण असून त्या भांडणाचा परिणाम म्हणून भारनियमन (Power Shortage) सुरू असल्याची टीका राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी करताना राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्र भारनियमन मुक्त करू असा दावा त्यांनी केला. (If Devendra Fadanvis became Cm There were no load shading)
माजी ऊर्जामंत्री बावनकुळे हे एक दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, केंद्र सरकारने राज्य सरकारला कोळसा उचलण्यासंदर्भात विनंती केली. मात्र राज्य सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झाले. ऊर्जा विभागांतर्गत असलेल्या या तीनही कंपन्यांमध्ये समन्वय नाही. त्याचबरोबर भ्रष्टाचाराने पातळी गाठल्याने महागडी वीज घेऊन जनतेवर त्याचा भार टाकला जात आहे.
ते म्हणाले, राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे फक्त बोलण्यात पटाईत आहे. अर्थमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांच्या भांडणामुळे भारनियमन सुरू असल्याची टीका त्यांनी केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोमणे सभा बंद करावी. त्याऐवजी राज्याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला देताना मुख्यमंत्री ठाकरे हे राष्ट्रवादीला शरण गेल्याचा आरोप केला.
मुख्यमंत्री सरकारी योजनांची माहिती घेतात ते त्यांचे काम असते. मात्र कामापेक्षा टोमणे मारणे यावर त्यांचा भर असतो. बारा कोटी लोकांची काळजी घेण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे आहे. दुसरीकडे मंत्री काही काम करत नाही. या तीनही पक्षांमुळे राज्याचे मोठे नुकसान होत आहे.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.