Governer Bhagatsingh Koshyari
Governer Bhagatsingh Koshyari Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मंत्र्यांनी कामे न केल्यास थेट माझ्याकडे या!

Sampat Devgire

नाशिक : मंत्र्यांकडून (Ministers) काम नाही झाले तर थेट माझ्याकडे या, मी सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगत राज्यपाल (Governer) भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी आदिवासी बांधवांसह सर्वसामान्यांना दिलासा दिला. (Governer assures trible leaders for privileges)

आदिवासी विकास विभागातर्फे जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटन मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल म्हणाले, आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासन काम करत आहे. आदिवासींच्या विकासासाठी राज्यघटनेने राज्यपालांना काही विशेष अधिकार बहाल केलेले आहेत. देशातील अनेक राज्यपालांनी या विशेषाधिकारांचा वापर अद्याप केलेला नाही. मात्र मी राज्यात नियमांमध्ये योग्य तो बदल केला आहे. या माध्यमातून आदिवासींच्या ७७६ वनहक्क दाव्यांची सुनावणी घेणे शक्य झाले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीचे पैसे थेट जमा करण्याबाबत राज्य शासनाला मी सूचना केल्या. आता विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होत आहेत. छोटे छोटे बदल करून सर्वसामान्य जनेतेचे प्रश्न सोडविता येतात. त्यासाठी जनतेनेही एक पाऊस पुढे येत मंत्र्यांपर्यंत गेले पाहिजे.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या आयुष्याच्या २५ वर्षांतच असे काम केले, की ते देवत्वापर्यंत पोचले. अशी अनेक देवमाणसे प्रत्येक आदिवासीच्या घरात निर्माण झाली पाहिजे. जनजातीचे लोक केवळ आदिवासी, वनवासी नाहीत. आदिवासींनी बनविलेल्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी बाजारपेठेची आवश्यकता आहे. ही बाजारपेठ उपलब्ध झाल्यास त्यांच्या वस्तूंना चांगला भाव मिळेल. यासाठी सरकार पावले उचलतील. आदिवासी समाजातील समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार असो की राज्य सरकार, काम करत आहेत. आदिवासींनी आपली कामे पूर्ण करण्यासाठी एक पाऊस पुढे आले तर केंद्र आणि राज्य सरकार दोन पावल पुढे येतील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

त्यांची मते लागणार आहेत...

राज्यस्तरीय आदिवासी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तब्बल अडीच तास उशिराने पोचले. उशिराने पोचलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणात चिमटा घेतला. कार्यक्रमासाठी आदिवासी बांधव बारा वाजेपासून उपस्थित आहे. त्यांना आपली मते नको आहे, तर त्यांची मते आपल्याला लागणार आहे, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना उशिराने आल्याची जाणीव करून दिली.

झिरवाळ यांनाही टोला

महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ अनेकवेळा आदिवासींचे शिष्टमंडळ घेऊन माझ्याकडे येत असत आणि ही कामे करा, असे सांगत असत. मात्र आता माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही. थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे जा. ते तुमचे कामे करतील. त्यांची कामे होतील, असे सांगत राज्यपाल कोश्यारी यांनी झिरवाळ यांना टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT