Raj Thackrey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackrey : भाजपची डोकेदुखी वाढणार; जळगावमध्ये सहा जागांवर मनसेचे उमेदवार

Raj Thackrey Politics : 'मनसे'प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. विधानसभेसाठी मात्र मनसेने स्वबळावर निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. जळगावमधील सहा जागांवर चाचपणी सुरू केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

Sampat Devgire

Raj Thackrey News : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. विधानसभेसाठी मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर निवडणुकीसाठी तयारीला लागली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची डोकेदुखी राज्यात वाढू शकते.

पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक मुंबईत घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला. या संदर्भात सर्व जिल्हाप्रमुखांना सूचना देण्यात आले आहेत.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि मनसेचे इच्छुक उमेदवार याचा अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय होईल. मनसेच्या या निर्णयाचा फटका महायुतीला बसतो की महाविकास आघाडीतील शिवसेना (Shiv Sena) उद्धव ठाकरे यांना बसतो हा उत्सुकतेचा विषय आहे.

जळगाव जिल्ह्यात 11 पैकी सहा मतदार संघात मनसे (MNS) उमेदवार देणार आहे. जळगाव शहर, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल, चोपडा आणि रावेर-यावल या सहा मतदारसंघात पक्षाकडे इच्छुक उमेदवार आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख वकील जमील देशपांडे यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यात मनसेचे चार जिल्हाप्रमुख आहेत. यामध्ये जमील देशपांडे, कमलाकर धारू, अनिल वाघ आणि मुकुंद रोटे चारही जिल्हाप्रमुख यंदा निवडणुकीसाठी उत्सुक आहेत. 2019 मध्ये जळगाव शहरातून ॲड देशपांडे आणि जळगाव ग्रामीण मतदार संघातून कमलाकर रोटे यांनी उमेदवारी केली होती. मात्र त्यांचा फारसा प्रभाव दिसला नाही.

यंदा ज्या सहा जागांवर उमेदवार देण्यात येणार आहे, तेथे सध्या भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य आहे. त्यामुळे मनसेने उमेदवार दिल्यास भारतीय जनता पक्षाचे डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपचे नेते मनसेच्या या निर्णयाचे कशाप्रकारे स्वागत करतात याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT