Eknath Shinde & Eknath Khadse
Eknath Shinde & Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`तो` एकनाथ त्रास देत असला तरी `हा` एकनाथ पाठीशी आहे!

Sampat Devgire

मुक्ताईनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची काल येथे सभा झाली. या सभेचे आयोजन माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे विरोधक आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आयोजित केली होती. त्यामुळे खडसे यांचे सर्व विरोधक झाडून हजर होते. त्यामुळे सर्वच नेत्यांनी खडसे यांना टिकेचे लक्ष्य केले. (CM Eknath Shinde target NCP leader Eknath Khadse in his public meeting)

मुक्ताईनगर येथील सभेत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार बच्चू कडू, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे आदी सर्वच खडसे विरोधक उपस्थित होते.

यावेळी एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना, मुख्यमंत्री म्हणाले खडसे यांनी या ठिकाणी एकाधिकारशाही निर्माण केली होती. मात्र ती आता चंद्रकांत पाटील यांनी संपवून टाकली आहे. तो एकनाथ जरी चंद्रकांत यांना त्रास देत असला तरी हा एकनाथ त्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या वेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर टीका केली, ते म्हणाले, `मी मी म्हणणाऱ्याचा वध झाला, रावणाचा, नरकासुराचा वध झाला. त्या मुळे त्यांचे दिवस संपले आहेत. आता आपले दिवस आले आहेत`

खडसेंच्या त्रासाला कंटाळलो

यावेळी स्थानिक आमदार व खडसे यांचे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, मला खडसे यांनी सतत त्रास दिला. मी लोकांची कामे करण्यासाठी राजकारणात आलो आहे. मात्र माझ्या मार्गात त्यांनी सतत अडथळा आणला.

ते म्हणाले, आपल्याला खडसे यांचा इतका त्रास झाला की, आपले सरकार असतानाही मला त्रास त्रास झाला, आपण राजकारण सोडण्याच्या तयारीत होतो. त्यांनी ३५ वर्षे काहीही केले नाही परंतु आपण काम करतो तर आपल्याला त्रास दिला जातो. मुक्ताईनगरात औद्योगिक वसाहत करण्याची त्यांनी मागणी केली. या वेळी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते अत्यंत विराट सभा होती.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT