Congress MLA Hiraman Khoskar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hiraman Khoskar : इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना 'कोरोना'ची लागण!

Mayur Ratnaparkhe

Nashik Congress News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची तयारी सुरु आहे. नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आणि पदाधिकारी मेळावा शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी नाशिक आणि नगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. या काँग्रेसच्या(Congress ) बैठक आणि मेळाव्याच्या आधीच आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

हिरामण खोसकर(Hiraman Khoskar) यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे हिरामण खोसकर उद्या होणाऱ्या काँग्रेसच्या बैठक आणि पदाधिकारी मेळाव्याला अनुपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा हिरामण खोसकर यांच्यावर ठपका आहे.

शुक्रवारी होणाऱ्या मेळाव्यासाठी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole), विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यातच आता हिरामण खोसकर यांच्याबाबत या बैठकीत काही निर्णय होतोय का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT