Laxman Hake  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Laxman Hake : ''स्थानिक स्वराज्य'च्या निवडणुका नाहीत, कारण ओबीसी आरक्षण संपवलंय'; लक्ष्मण हाकेंचा घणाघात

Pradeep Pendhare

Ahmednagar News : "स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात नेल्यानं तिथं निवडणुका होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कधीच संपवून टाकलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर डोळ्यावर पट्टी बांधली आहे. विधानसभा निवडणुकीत 18 पगड जातीनं एकत्र येऊन ओबीसी आरक्षण वाचवावं", असा घणाघात ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला.

ओबीसी आरक्षण (Reservation) वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके राज्यभर दौरे करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लक्ष्मण हाकेंनी आपल्या दौऱ्यांना गती दिली असून, ओबीसींना एकत्र येण्याचं आवाहन करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी इथं ओबीसी आरक्षण जनजागृती सभेत, ही अस्तित्त्वाची लढाई आहे. हक्कासाठी आता संघर्ष केला नाही, तर ओबीसी आरक्षण संपून जाईल. आपपासात भांडण न करता संघर्षासाठी एकजूट दाखवा आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या हक्का माणूस निवडून पाठवू द्या, असं आवाहन हाके यांनी केलं.

लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मनोज जरांगेवर निशाणा साधताना, 1931 मध्ये इंग्रजांनी जातीनिहाय गणना केली होती. त्यावेळी राज्यात 40 टक्के ओबीसी लोक होतं. आता ही संख्या कशी कमी झाली, त्यासाठी कोणता आधार लावला हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं. म्हणूनच, एकनाथ शिंदेंनी ओबीसी आरक्षणाबाबत डोळ्यावर पट्टी बांधून घेतलीय आहे. मराठा समाज मागास आहे, हे मनोज जरांगे वारंवार सांगतात, तर कोणता समाज पुढारला हे त्यांनी सिद्ध करावं. कारखाने, जिल्हा बँका तुमच्याच ताब्यात आहेत. आमदार आणि खासदार सर्वाधिक तुमचेच असताना, तुम्ही मागास कसे हा प्रश्न हाके यांनी यावेळी उपस्थित केला.

आरक्षणाची चौकट मोडली जातेय

'आरक्षणाची चौकट मोडण्याचं पाप हे सरकार करत आहेत. यासाठी विधानसभा आणि लोकसभेत आपली माणसं पाठवून आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. ही स्वाभिमानाची लढाई आहे. लोकनेते बबनराव ढाकणे यांनी मंडल आयोग आणि ओबीसी आरक्षणाला पाठिंबा दिलो होता. स्वाभिमानाच्या लढाईसाठी त्यांनी राजदंड देखील पळवला होता. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी त्यांची भूमिका आठवा', असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. पाथर्डीतील नाईक चौकात झालेल्या या सभेसाठी गोकुळ दौंड, संभाजी पालवे, किसन आव्हाड, डाॅ. सुहास उरणकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT