Chalisgaon APMC Election  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

APMC Election : चाळीसगाव बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर दोन गटात राडा; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

Maharashtra APMC Election News Update : चाळीसगाव बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर महाविकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.

कैलास शिंदे

Jalgaon News : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान प्रक्रिया काही ठिकाणी शांततेत पार पडत आहे. मात्र, काही ठिकणी काहीसा गोंधळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर दोन गटात राडा झाल्याचे समोर आले आहे.

चाळीसगाव बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्हा बँक कार्यालयाजवळील मतदान केंद्रावर महाविकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे येथे मोठी गर्दी झाली. गर्दीला पांगविण्यासाठी पोलीसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार मतदान केंद्रात गेल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी हरकत घेतली. त्यांना बाहेर काढण्याची मागणी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केला. त्यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. त्यावेळी मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली. पोलीसांनी या गर्दीला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

दरम्यान, जळगाव बाजार समितीसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या केंद्रावर मतदानासाठी नागरीकांच्या रांगा लागल्या आहेत. तर चाळीसगाव बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर पोलीसांनी गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT