Barsu Refinery Protest: मी देखील तेथे जाणार, मग बघू...; बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजू शेट्टींचा सरकारला इशारा

Raju Shetty On Barsu Refinery Protest: ''सरकार दादागीरी करत उद्योगपतीची बाजू घेत असेल तर आम्ही गप्प बसणार नाहीत...''
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : गेल्या काही दिवसांपासून रिफायनरी प्रकल्पावरुन सुरू असलेला वाद चिघळला आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तर काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आता राजकारण तापलं आहे.

दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवरच शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही आता या प्रकरणात उडी घेतली आहे. आपण देखील वेळ पडली तर तेथे जाणार असून मग पाहू किती अन्याय करता, असा इशारा राजू शेट्टींनी सरकारला दिला.

Raju Shetti
Barsu Refinery Protest: विनायक राऊत, पत्रकारांवर पोलिसांची दडपशाही; बारसू रिफायनरी संघर्ष चिघळण्याच्या मार्गावर

राजू शेट्टी म्हणाले, "पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला आहे. पोलिसांचं हे वर्तन चुकीचे आहे. त्यामुळे याचा मी निषेध करतो. शेतकरी जर जमीन द्यायला तयार नसतील तर सरकार कोणत्या आधाराने त्यांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीने सरकार दादागीरी करत उद्योगपतीची बाजू घेत असेल तर आम्ही गप्प बसणार नाहीत".

"पोलिसांनी शेकऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे यामध्ये गृहमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावं. आम्ही बारसूच्या शेतकऱ्यांना एकाकी पडू देणार नाहीत. ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभा आहोत. जर वेळ पडली तर मी देखील त्या ठिकाणी जाईल. मग बघू सरकार किती अन्याय करतं", असा इशारा शेट्टींनी सरकारला दिला आहे.

Raju Shetti
Karnataka Election News: भाजप नेत्यांचा पराभव टाळण्यासाठी अमित शहा मैदानात : 10 जागांवर विशेष लक्ष

उद्योगमंत्री उदय सामंत काय म्हणाले?

बारसू रिफायनरी विरोधातील स्थानिकांचा विरोध वाढला आहे. यावर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंदोलनाच्या नावाखाली राजकारण सुरू असल्याचा आरोप केला आहे.

उदय सामंत म्हणाले, "शेतकऱ्यांना आजही आमचं सांगणं आहे, त्यांनी कोणाच्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. शेतकऱ्यांच्या काही शंका असतील तर त्या दूर करण्यासाठी सरकार तयार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यासंदर्भात आमच्याशी चर्चा केली आहे".

"शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, कोल्हापूरमधील काही लोकं या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे राजकारण होऊ नये असंच आमचं मत आहे", असं सामंत म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com