Vijaya Rahatkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vijaya Rahatkar : विजया रहाटकरांनी भाजप प्रचाराचं स्लोगन सांगितलं; तयारी करा आणि घराघरापर्यंत जा...

Pradeep Pendhare

Ahmednagar News : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी विरोधकांच्या खोट्या प्रचारावर तुटून पडल्या. महाराष्ट्रात पुन्हा भाजप महायुतीचे सरकार हवे असेल, तर बूथ ते सोशीय मीडियापर्यंत वैचारीक लढाई लढावी लागणार आहे.

त्याची तयारी करा, मैदानात उतरा आणि भाजप सरकारने केलेल्या विकासला घरोघरी घेऊन जा, असे सांगताच 'अपनी सरकार अच्छी सरकार', ही घोषणा विजया रहाटकर यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिली. राहाता इथं भाजपच्या अधिवेशनात त्या विरोधकांवर तुटून पडल्या होत्या.

विरोधकांनी भाजपविरोधात (BJP) खूप खोटा प्रचार केला. भाजप कार्यकर्त्यांनी तो रोखला पाहिजे, असे सांगत विजया रहाटकर यांनी विरोधकांच्या खोट्या प्रचाराचा समाचार घेतला. "लोकसभा निवडणुकीत देशवासियांनी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसविण्यासाठी समर्थन दिले. ही किमया फक्त प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेल्या योजनांची होती. काँग्रेस सरकारच्या काळात फक्त घोषणा होत्या. मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रधानसेवक म्हणून सेवा केली. हीच ओळख भाजप कार्यकर्त्यांनी लोकांपुढे घेऊन जात विरोधकांचा खोट्या प्रचाराचा बुरखा फाडायचा आहे", असे विजया रहाटकर यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत वाईट शक्‍ती एकत्रित आल्‍या. सरकारच्‍या विरोधात खोटा अपप्रचार करुन, दिशाभूल करण्‍याचे काम जाणीवपूर्वक झाले. मात्र संविधानामध्‍ये बदल करण्‍याचे आणि सोयीनुसार त्‍याचा वापर करुन, अनेक राज्‍यांची सरकार बरखास्‍त करण्याचे काम याच काँग्रेस पक्षाने केले. याचा सोयीस्‍कर विसर राहुल गांधी यांना पडला. संविधानाचा सर्वाधिक अपमान काँग्रेस सरकारच्‍या कार्यकाळात झाला. या उलट संविधानाचा सन्‍मान करण्‍याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्‍या कार्यकाळात झाल्‍याकडे रहाटकर यांनी सांगितले.

केंद्र सरकारने अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय आणि ओबीसींचे हक्‍क आबादीत ठेवण्‍याचे काम केले. त्‍यासाठी मोठे काम केले. आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल घटकांसाठी केलेल्‍या निर्णयामुळे त्‍यांनाही सर्व संधी मिळाल्‍या. परंतु केवळ सरकारच्‍या विरोधात खोट्या अफवा पसरवून विरोधकांनी अपप्रचार केला असला, तरी देशातील जनतेने कुठेही भारतीय जनता पक्षाला नाकारलेले नाही, असे सांगत विजया रहाटकर यांनी मतांच्‍या टक्‍केवारीकडे लक्ष वेधले.

योजनांची विरोधकांकडून बदनामी

महायुती सरकारनेही मागील अडीच वर्षात सर्वाधिक लोकहिताचे निर्णय घेतले. आज मराठा आराक्षणावरून, सरकारला आणि देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्‍याचे काम सुरू आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्‍याचे काम भारतीय जनता पक्षामुळेच झाले. महाविकास आघाडीने उलट हे आरक्षण घालविले. न्‍यायालयात बाजू मांडण्‍यासाठी वकीलही उभे केले नाहीत. महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी लाडकी बहीण, मुलींना मोफत शिक्षण आणि शेतकऱ्यांसाठी सौरपंपाची योजना सुरू केली आहे. या योजनांसाठी बूथस्‍तरापर्यंत कार्यकर्त्‍यांना काम करायचे आहे, असे विजया रहाटकर यांनी सांगितले. विरोधक संधी साधतात. एकीकडे योजनांना नावे ठेवायची. महाविकास आघाडीचे नेतेच योजनांचा प्रचार करीत असले तरी, योजना बदनाम, कशा होतील हाच प्रयत्‍न आहे, असा आरोप विजय रहाटकर यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT