Ladki Bahin Yojana : अर्ज नामंजुरीचे मेसेज येताच, लाडकी बहीण हवालदिल

Application of Ladki Bahin Yojana rejected in Karjat : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील अर्ज भरलेल्या महिलांना छाननीत अर्ज नामंजूर असे संदेश मिळाले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. सत्ताधारी देखील या योजनेचा गाजावाजा करत आगामी विधानसभा निवडणुकीला समोरे जाण्याची तयारी करत आहेत.

नगर जिल्ह्याच्या कर्जत तालु्क्यातून या योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाभार्थी महिलांचे अर्ज नामंजूर होत असलेले संदेश येऊ लागले आहेत. त्यामुळे प्राप्त महिलांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 7 लाखांच्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची आता छाननी सुरू आहेत. अर्ज छाननी जिल्हास्तरीय समिती करणार असली, तरी राज्य सरकारच्या आदेशानुसार अंतिम निर्णय विधानसभा क्षेत्र समितीचे अध्यक्ष घेणार आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एकूण 38 हजार 142 अर्ज लाभार्थी महिलांनी अर्ज भरलेत. या अर्जांची छाननी जिल्हास्तरीय समितीकडून सुरू आहे. या छननीत अर्ज अपूर्ण भरणे, त्रुटी असणे, कागदपत्रांची अपूर्तता या कारणाने 2 ते अडीच हजार (6 ते 8 टक्के) अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय समितीकडून हे अर्ज नामंजूर करताना अंशतः आणि तात्पुरते नामंजूर, असे संदेश प्रशासनाच्या प्रणालीकडून महिलांना (women) मोबाईलवर पाठवले जात आहे. यामुळे महिलांमध्ये खळबळ उडाली आहे.

Ladki Bahin Yojana
BJP Convention : भाजपमध्ये शिस्तीवरून बोंबाबोंब; मंत्री, आमदार आणि प्रमुख नेत्यांची अधिवेशनाकडे पाठ

भाजप (BJP) महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरवात केली असून लाभार्थी महिलेस दरमहा दीड हजार रुपये अनुदान मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांची झुंबड उडाली. योजनेत सहभागी होण्यासाठी महिला कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहेत. सासरहून माहेरची गाडी धरत कागदपत्रांची घेऊन येत योजनेची माहितीची पूर्तता करीत अर्ज भरले आहेत. नगर जिल्ह्यात तब्बल 7 लाखांच्यावर महिलांनी अर्ज भरले आहेत. कर्जत तालुक्यात आजमितीस 38 हजार 142 अर्ज प्राप्त झाले.

Ladki Bahin Yojana
Nandurbar News: विरोधक-सत्ताधारी भिडले; झेडपीच्या सभेत माईक खेचला!

या अर्जाची छाननी प्रक्रिया सरकारकडून सुरू झाली असून ज्यांचे अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह दाखल करण्यात आले. त्यांना लाभार्थी म्हणून संदेश प्राप्त झाले. मात्र कर्जत तालुक्यातील तब्बल 2 ते अडीच हजार महिलांना काही कारणास्तव अर्ज नामंजूर झाल्याचा संदेश मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. यामुळे लाभार्थी महिलांनी अंगणवाडी सेविका यासह राजकीय पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

अर्ज पुन्हा भरण्याची संधी

कर्जतचे बालविकास प्रकल्प अधिकारी प्रशांत मिटकरी यांनी सरकारी निकषानुसार पात्र असणारी एक ही महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही. अर्ज छाननी प्रक्रियेत ज्या लाभार्थ्यांनी संपूर्ण अर्ज भरला, पण तो लाभासाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची कमतरता असणे, आधारकार्ड किंवा बँक पासबूक नावात बदल असणे किंवा हमीपत्रावर अर्धवट सही यासह काही रकाने मोकळे सोडणे यामुळे नामंजूर झाल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र त्यांना पुन्हा एकदा त्रुटी निघालेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यावेळी योग्य सर्व माहिती अचूक भरून तो ऑनलाइन सबमिट करावी, असे आवाहन प्रशांत मिटकरी यांनी केले.

तहसीलदार बिराजदार सरसावले

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांनी अचूक अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन दाखल करावा. छाननी झालेल्या अर्जामध्ये ज्यांना अंशतः आणि तात्पुरते नामंजूर म्हणून संदेश प्राप्त झाले आहेत. त्यांना पुन्हा संधी मिळणार असून त्रुटी असलेले कागदपत्रांची पूर्तता करीत योजनेचा लाभ घ्यावा. काही अडचण आल्यास तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी यासह संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायत तसेच अंगणवाडी सेविका यांच्याकड़े संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार गुरू बिराजदार यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com