Dr. Bharati Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr. Bharati Pawar News : राम मंदिराचे लोकार्पण कोरोनाच्या छायेत ? मंत्री डॉ. भारती पवार यांच्या आरोग्य यंत्रणेला सूचना..

Covid New Variant : देशात जेएन 1 व्हेरियंटमुळे चिंतेचे वातावरण असून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

संपत देवगिरे

Dr. Bharti Pawar News : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या प्रसाराबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. अयोध्येत येत्या 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. देशभरातील लाखो भाविकांची गर्दी येथे होईल. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

देशभरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. पण, दुसरीकडे गत काही वर्षांपासून धास्ती असलेल्या कोरोना (Corona) ने पुन्हा डोके वर काढले आहे. सध्या देशात जेएन 1 व्हेरियंटमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अयोध्येत (Ayodhya) येत्या 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येसह देशभरातील राज्यांना व आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात असून, सर्वच राज्यांना सतर्क करण्यात आले आहे. देशात सध्या दिवसाला 200 ते 250 कोरोना रुग्ण आढळून येत असून 3 हजार 500 रुग्णांवर देशभरात उपचार सुरू आहेत. यात 16 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) म्हणाल्या, या व्हेरियंटचा देशातील केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत असल्याचे अढळले आहे. या राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र, सध्या सुट्टीचे दिवस असल्याने नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे खबरदारीच्या सूचना आरोग्य यंत्रणेला करण्यात आल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिक, इतर व्याधींनी त्रस्त असणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे तसेच गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करण्याचे आवाहन डॉ. पवार यांनी केले. केरळमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने तिथे जास्त प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याबरोबरच जिनोम सिक्वेन्सिंग केले जात असून, चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT