Drugs Mafia Lalit Patil : ‘ललित पाटीलचे हप्ते मालेगावला पोहोचत होते..!’ संजय राऊत यांचा आरोप..

Shivsena Politics : सबंध शिवसेना सुधाकर बडगुजर यांच्या पाठीशी आहे. आमच्यावर दगड फेकाल तर तुमची देखील डोकी फुटतील, असा दिला इशारा..
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Drugs Mafia Lalit Patil : ललित पाटीलकडून मालेगाव येथून घराघरांत कसे हप्ते पोहोचत होते, त्या व्यवहारात तुमची मुलबाळं कशी सहभागी होती, याची माहिती आम्ही आता पोलिसांना देऊ. यात 'छोटी भाभी, बडी भाभी' सर्वकाही येईल, असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. तसेच शिवसेना सुधाकर बडगुजर यांच्या पाठीशी ठाम आहे. आमच्यावर दगड फेकाल तर तुमची देखील डोकी फुटतील, असा दिला इशारा यावेळी राऊत यांनी दिला.

शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, वॉशिंग मशीनवाल्या भाजपला आमचा इशारा आहे. राजकारणात कोणत्या थराला जायचे याचे काही संकेत आहेत. तुम्ही जे करताय, तो न्याय लावला तर सबंध भाजप रिकामा करावा लागेल.

Sanjay Raut
Salim Kutta Case : सलीम कुत्ताची पार्टी भाजप पदाधिकाऱ्याची? राऊतांनी फडणवीसांसोबत कुणाचे फोटो दाखवले?

भारतीय जनता पक्षाने (BJP) ठरवलेलं आहे, ‘स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचे बघायचे वाकून’. सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) हे अनेक वर्षांपासून नाशिकच्या राजकारणात कार्यरत आहेत. बडगुजर यांचे नाव ज्यांच्या बरोबर जोडले गेले आहे, तो एक अपघात आहे. असंच असेल तर देशातला अख्खा भारतीय जनता पक्ष रिकामा करावा लागेल, असे राऊत यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरू आहे. त्याला हरकत नाही, ते देखील चौकशीला सामोरे जात आहे. आम्ही तुम्हाला काही नावे देऊ त्यांचीही चौकशी करा. ललित पाटीलकडून मालेगाव येथून घराघरांत कसे हप्ते पोहोचत होते, त्या व्यवहारात तुमची मूलबाळं कशी सहभागी होती, याची माहिती आम्ही आता पोलिसांना देऊ. यात छोटी भाभी, बडी भाभी सर्वकाही येईल.

कारण नसताना आमच्या अंगावर दगड मारण्याचा प्रयत्न कराल, त्या वेळेस तुमचीदेखील डोकी फुटतील. राजकारण- समाजकारणामध्ये काही पथ्य पाळायचे असतात, आम्ही ती पाळतो, असा इशारा राऊत यांनी सरकारला दिला.

(Edited by Amol Sutar)

Sanjay Raut
Sharmila Thackeray: ठाकरे बंधू एकत्र येणार का ? शर्मिला ठाकरेंचं सूचक विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com