Congress decline in India : 2014 मध्ये देशात मोठं सत्ता परिवर्तन झालं. भाजपप्रणित सरकार केंद्रात आलं. तेव्हापासून ते आजपर्यंत काँग्रेस देशाच्या सत्तेपासून बाहेर आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान असलेल्या काँग्रेसची आजची परिस्थिती म्हणजे, आता बोटावर मोजता येईल, एवढ्याच राज्यात सत्ता राहिली आहे. तर दुसरीकडे भाजप अनेक राज्यात जिंकत चालला आहे. एकप्रकारे देशात काँग्रेस नेतृत्वहीन दिसतो आहे.
काँग्रेसची भविष्यातील वाटचाल नेमकं कशी आहे किंवा कशी असेल, याचा आजमतीस तरी अंदाज बांधता न येणारा आहे. त्यामुळे देशातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विंग सैरभैर झाली असून, काँग्रेसमधून आउटगोइंक, तर सत्ताधारी भाजपकडे इनकमिंग दिसते. या सर्व परिस्थितीवर ज्यांच्या घरात पिढ्यान पिढ्या काँग्रेस आहे, असे नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी चिंता व्यक्त केली.
आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe Patil) यांनी काँग्रेसच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेस हा एक विचार आहे. तो संपणार नाही. देशासाठी हा विचार गरजेचे आहे, असे सांगताना, सध्याच्या काँग्रेसच्या वाटचालीविषयी चिंता व्यक्त केली आहे. आमदार तांबे यांनी सकाळ माध्यम समूहाच्या 'सरकारनामा'शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी, देशातील काँग्रेस अन् त्याच्या नेतृत्वावर भाष्य केले.
सत्यजीत तांबे म्हणाले, "आजच्या काँग्रेसविषयी (Congress) चिंता वाटते. चिंता प्रेमानं वाटते. कारण त्या पक्षावर माझं प्रेम आहे. कारण तो विचार, त्यातून लहानाचे मोठं झालो आहोत. आज काँग्रेसमध्ये कोणीच 'सिरियस' नाही. किंवा देशाच्या विरोधी भूमिका घेण्याचं काम सुरू आहे. देश एका बाजूला चालला आहे, तुम्ही मध्येच काही काढता, हे कुठंतरी मनला खटकतं, काय धोरण आहे तुमचं? राजकारण म्हणून धोरण काय?"
'दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानविरोधात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीवर शशी थरूरांना देशाची बाजू मांडण्यासाठी निर्माण केलेल्या शिष्टमंडाळाचे प्रमुख केले. काँग्रेसने पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे की, काँग्रेसमधून कोणी पाठवायचं, तुम्ही का ठरवणार? आम्ही आमचे नाव देणार, हे कोणाचे नाव देणार, ते त्यांच्याच आजूबाजूला लोकं आहेत. लांगूनचालून करणाऱ्यांची नावं देणार, शशी थरूर यांना देणार नाही', असे आमदार तांबे यांनी म्हटलं.
'शशी थरूर यांच्यासारख्या लोकांना का नको, तर हे चांगले लोकं आहेत, स्वतः मत आहे, वैचारिक लोकं आहे, त्यांना जनाधार आहे, अशा लोकांना, काँग्रेसमध्ये दिल्लीत बसलेली चांडाळ चौकडी हेट करते, तिरस्कार करते, ह्या चुकीच्या गोष्ट होत नाही का? याचा फटका मला देखील बसला. वीस वर्षे काम करतोय, पण संघटना म्हणून मला काहीच दिलेलं नाही', याकडे देखील सत्यजीत तांबे यांनी लक्ष वेधले.
'युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो ते, निवडणुकीतून झालो. तीन निवडणुका लढलो. विश्वजीत कदमांविरोधात दोन निवडणुका लढलो, तिसऱ्या निवडणुकीवेळी मी अध्यक्ष झालो. पण मी एक गोष्ट कधीच विसरू शकत नाही की, या पक्षाने मला ओळख दिली. चांद्यापासून ते बांध्यापर्यंत, काम करायची संधी दिली. मित्रपरिवार दिला. तो कधीच संपवू शकत नाही', असेही सत्यजीत तांबे यांनी म्हटले.
'काँग्रेसचा विचार या देशातून कधीच संपू शकत नाही. काँग्रेसची गरज आहे का, तर शंभर टक्के आहे. काँग्रेस पार्टी म्हणून भविष्य चिंतेत वाटतं, कारण यात इनकमिंग नाही. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेत काम केलं आहे. काँग्रेसच्या विद्यार्थी (NSUI) संघटना कुठं आहे. कुठं आंदोलन करता दिसते का?' असा सवाल सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला.
'गेली पंधरा वर्षे झाले, महाराष्ट्राचा एकच मुलगा या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे. तो परफॉर्मन्स देत असता, तर मी मान्य करू शकतो. तो दिसत नाही, ग्राऊंडवर नाही, प्रश्न विचारात नाही, विद्यार्थ्यांसमोर किती गंभर प्रश्न उभे आहेत. विद्यार्थ्यांना फी, स्काॅलरशीपची अडचणी आहेत, अॅडमिशन,नोकऱ्यांची अडचण आहे. पालकांच्या वेगळ्याच अडचणी आहेत, काँग्रेसच्या याच विद्यार्थी संघटनेत, इनकमिंग असेल, तर पुढं-पुढं युवक काँग्रेस, मुख्य प्रवाहात येऊन नगरसेवक पदासाठी काम करण्यासाठी हेच तयार होतील. पुढं आमदार-खासदार होतात, इथं आता काहीच नाहीत, त्यामुळे काँग्रेसच्या भवितव्याविषय़ी चिंता आहे', असे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.