Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःचेच आदेश का फिरवतात?

नाशिक येथील सिडकोचे कार्यालय पूर्ववत सुरु ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने काढले होते.

Sampat Devgire

सिडको : सध्याचे राज्य सरकार (Shinde-Fadanvis Government) म्हणजे सत्तेत आले तर संधीचे सोने करा, या पद्धतीने काम करते की काय, अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एका गटाचे ऐकून आदेश देतात. नंतर दुसरा गट त्यावर विरोधात जाताच तो आदेश मागे घेतात. नाशिकच्या सिडको (Nashik Cidco office close down) कार्यालय बंद करण्याच्या आदेशाचे असेच झाले. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतःचेच आदेश फिरवतात असे चित्र निर्माण झाले आहे. (CM Shinde roll back his orders of close down Nashik Codco Office)

सिडकोचे प्रशासकीय कार्यालय बंद करण्याच्या परिपत्रकानंतर सिडकोवासीयांसह राजकीय पुढारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यात निर्माण झालेल्या रोषानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तेक्षप केल्याने हे कार्यालय आता सुरूच राहणार आहे. या कार्यालयात लिपिक तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदस्थापना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सिडकोवासीयांच्या मागणीला यश मिळत दिलासा मिळाला आहे.सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना मुख्यमंत्र्यांनी याबाबत पत्र पाठविले आहे.

सिडको कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती सिडको परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून, नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. तत्पूर्वी सिडकोने भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी, लिज होल्ड ते फ्री होल्ड करण्याची व इतर अनुषंगिक बाबींची कार्यवाही अद्याप प्रलंबित आहे. ही बाब विचारात घेता सिडको प्रशासनाला या कामाकरिता आवश्यक असणारा कमीत कमी लिपिकवर्गीय कर्मचारीवर्ग नाशिक कार्यालयात कायम ठेवावा. परंतु, अन्य अधिकारी कर्मचारी, विशेषतः तांत्रिक संवर्ग यांना आवश्यकतेनुसार इतरत्र पदस्थापना देण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास अवगत करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

सिडकोत २८ हजार घरे असून, एक लाख ३५ हजार मतदार आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोच्या घराला फ्री होल्ड करणार अशी घोषणा केली होती. मात्र ती कृतीत अजून उतरली नाही. आजचा निर्णय लोकशाहीचा, जनमताचा विजय आहे. सिडकोतील रहिवासियांना फ्री होल्ड व मालकी हक्क मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना लढतच राहणार आहे.

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

सिडकोची घरे फ्री होल्ड करावीत, तोपर्यंत सिडको कार्यालय सुरूच ठेवावे, अशी आम्ही मागणी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोवासीयांना दिलासा दिला आहे. आता सिडकोची घरे फ्री होल्ड होऊन सिडकोवासीयांना घराची पूर्ण मालकी मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील.

- प्रवीण तिदमे, महानगरप्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT