Baramati : सीतारमण पुन्हा बारामतीत येणार : राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न?

Baramati : या दौऱ्यांकडे राजकीय अर्थाने पाहिले जात आहे.
Nirmala Sitaraman
Nirmala SitaramanSarkarnama
Published on
Updated on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारासंघावर २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विशेष लक्ष केंद्रित करत आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा नुकताच बारामती दौरा झाला. यानंतर आता केंद्रीय अन्न प्रक्रिया व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल शुक्रवारपासून (ता. ११) बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. सीतारमण पुन्हा बारामतीचा दौरा करणार असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी पटेल बारातीला येत आहेत.

Nirmala Sitaraman
Sanjay Raut : माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून ; राऊतांचा अप्रत्यक्षपणे मोदी-शहांवर हल्ला!

भाजपने २०२४ च्या निवडणुकांच्या दृष्टीने बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने या दौऱ्यांकडे राजकीय अर्थाने पाहिले जात आहे. राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लवकरच बारामतीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी पटेल बारामतीत येत आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

Nirmala Sitaraman
राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही म्हणणारे, ब्रिजभूषण सिंह पुण्यात येणार : मनसेकडून मात्र विरोध नाही!

‘‘मागील महिन्यात सीतारमण यांचा बारामतीचा दौरा झाला. यानंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीस पुन्हा एकदा बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी पटेल बारामतीला भेट देत आहेत.

दौऱ्याला खडकवासला मतदारसंघापासून सुरू होणार असून, येथे लोकसभा व विधानसभेच्या कोअर टीमची बैठक घेणार आहेत. त्यानंतर भोर मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व महिला बचत गटाच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. बारामतीत विधानसभा मतदारसंघात शाखा उद्घाटन, तेथील शहर कार्यालयाला भेट दिल्यानंतर इंदापूर आणि दौंड येथे कार्यकर्ता मेळावा पटेल घेणार आहेत’’, असे शेवाळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीची बारामतीतच कोंडी करून, राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांना गुंतवून ठेवून, आगामी राष्ट्रवादीची कोंडी करण्याची भाजपची योजना असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता भाजप नेत्यांचा बारामतीत वारंवार दौरा होणार असल्याची, माहिती मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com