Girish Mahajan Speaks to Dubai stranded tourists Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Israel Iran War : मोठ्या हॉटेलमध्ये थांबू नका, दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना गिरीश महाजनांनी का दिला असा सल्ला?

Girish Mahajan statement on Dubai stranded tourists: महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील २५ जण एका दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकले आहे, त्यांच्याशी मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरुन संवाद साधला.

Ganesh Sonawane

Maharashtra citizens stranded in Dubai Israel Iran war: अमेरिका- इस्रायल आणि इराण मधील युद्धाचा भडका उडाला आहे. त्याचा परिणाम विमानसेवेवर झाला असून महाराष्ट्रातील अनेक पर्यटक विदेशात अडकले आहेत. दुबईमध्ये अडकलेल्या धुळे जिल्ह्यातील पर्यटकांशी आपत्ती व व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी संवाद साधला.

धुळ्यातील हे पर्यटक सध्या दुबईतील फेस्टिव्ह सिटी येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असून पूर्णपणे सुरक्षित आहे. धुळ्यातील २५ जण दुबईत अडकल्याची माहिती मिळाली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे हवाई सेवेवर परिणाम झाला असून त्यामुळे विमानसेवा रद्द केली आहे. दरम्यान या पर्यटकांना मायदेशात आणण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह धुळ्यातील आमदार अनुप अग्रवाल सरसावले आहे.

दुबईत अडकलेल्या धुळ्यातील नागरिकांसोबत गिरीश महाजन यांनी फोनवर संवाद साधत त्यांना धीर दिला आहे. आम्ही २५ जण दुबईत एका हॉटेलमध्ये अडकलो आहोत अशी माहिती एका पर्यटकाने महाजनांना फोनवर दिली.

हॉटेल मालक पेमेंट करण्याची मागणी करत आहेत असं ते त्यांनी सांगितलं. त्यावर पैसे कमी पडले तर आम्ही इकडून पाठवतो असं गिरीश महाजन यांनी त्यांना सांगितलं. पण भाड्यासाठी रडत बसू नका आम्ही आहोत.

उलट सुरक्षिततेच्या दृष्टीने छोट्या हॉटेलमध्ये थांबा, मोठ्या हॉटेलमध्ये थांबू नका. खूप मोठी पन्नास मजली, साठ मजली अशा इमारतीत थांबू नका असा सल्ला महाजन यांनी पर्यटकांना दिला. पैशांची चिंता करु नका, पण सुरक्षिततेच्या दृष्टीने छोट्या हॉटेलला थांबलेलं बरं राहील असा सल्ला दिला.

काहीही काळजी करु नका आम्ही केंद्र सरकारशी बोलत आहोत. मुख्यमंत्री महोदय देखील बोलत आहेत. बाहेर फिरु नका, जिथे आहेत तिथेच थांबा. दुसऱ्या हॉटेलवाल्याशी आधी बोलून घ्या मगच आहे ते हॉटेल सोडा असा सल्ला महाजन यांनी पर्यटकांना दिला. घाबरु नका, आपण मार्ग काढू असा धीर महाजन यांनी दिला. शासन प्रयत्न करत आहे. काही असलं तर माझ्या नंबरवर संपर्क करा असं महाजन म्हणाले.

आमदार अग्रवाल सरसावले

धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी देखील या पर्यटकांना मायदेशी आणण्यासाठी पुढाकार घेतला असून, या सर्व नागरिकांशी थेट संपर्क साधून त्यांना धीर दिला आहे. तसेच, त्यांना लवकरात लवकर सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी राज्य सरकारकडे तातडीने पाठपुरावा सुरू केला आहे.

मदार अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. या नागरिकांना विशेष विमानाने किंवा उपलब्ध मार्गाने महाराष्ट्रात परत आणण्यासाठी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्याची विनंती त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT