Nashik Crime : महिलेची दोन लाखांना विक्री करत लावलं लग्न, तीनशे ग्रामस्थांचा वेढा मोडीत नाशिक पोलिसांनी केली सुटका

forced marriage case Nashik : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन महिला एजंटने एका महिलेचे दोन लाख रुपयांना विक्री करत बळजबरीने लग्न लावून दिले.
forced marriage case
forced marriage caseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : पतीपासून विभक्त असलेल्या १९ वर्षीय विवाहितेच्या हतबलतेच्या गैरफायदा घेत दोन महिला चक्क तीची विक्री केली. विवाहितेला इव्हेंटच्या कामाला जायचे असल्याचे सांगत मालेगावमार्गे नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे नेत तिची दोन लाखांत विक्री करत बळजबरीने लग्न लावून दिले. मात्र, नाशिकच्या सातपूर पोलिसांनी तीनशे ग्रामस्थांच्या जमावाचा वेढा मोडीत अतिशय धाडसाने पीडित महिलेची सुखरुप सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील सातपूर येथील कार्बन नाका परिसरात १९ वर्षीय विवाहिता तिच्या आईकडे राहते. २७ फेब्रुवारीला विवाहिता काहीही कारण न सांगता घरातून निघून गेली होती. २८ फेब्रुवारीला सकाळी तिने आईशी संपर्क साधला, राणी आणि भागी नावाच्या दोन महिलांनी तिला आपल्या जाळ्यात ओढत तिची दोन लाखांत विक्री करीत जातेगावातील (ता. नांदगाव) युवकाशी बळजबरीने विवाह लावण्यात आल्याचे सांगितले.

तुला इव्हेंटचे चांगले चांगले काम मिळवून देतो असे आमिष दाखवून पीडित महिलेला संशयित दोन्ही महिलांनी एका कारमध्ये बसवून मालेगाव मार्गे डायरेक्ट नांदगावमध्ये नेले. त्याठिकाणी दोघींनी तिची दोन लाखांत विक्री केली आणि तिचा नवनाथ खिराडकर याच्यासोबत बळजबरीने विवाह लावून दिला. मात्र, तिने संधी साधत आईला माहिती दिली. महिलेच्या आईने तत्काळ सातपूर पोलिस ठाणे गाठत घटनेची माहिती दिली.

forced marriage case
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, जळगावचे पाटील धरणार एकनाथ शिंदेंचा हात ; मुहूर्त ठरला

त्यानंतर पोलिस थेट नांदगाव तालुक्यातील जातेगावात पोहचले. पथकाने पीडित महिलेला ताब्यात घेतले असता दोनशे ते तीनशे स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना वेढा घातला. पीडितेला घेऊन जाण्यास विरोध केला. दोन लाख देऊन मुलीसोबत विवाह लावला आहे. त्या दोन एजंट महिलांना समोर आणा आणि दोन लाख रुपये परत द्या, त्यानंतर मुलीला घेऊन जा असा आक्रमक पवित्रा जमावाने घेतला.

forced marriage case
Neelam Gorhe : बोलता बोलता निलम गोऱ्हेंकडून मोठं सिक्रेट उघड; सत्ताधारी-विरोधकांचं गुपित बाहेर

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून नाशिक-सातपूर पोलिसांच्या मदतीला नांदगाव पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी आली. सातपूर आणि नांदगाव पोलिसांनी संयम आणि धाडस दाखवत सुमारे तीनशे ग्रामस्थांच्या जमावाचा प्रतिकार मोडीत काढत पीडितेची सुखरूप सुटका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com