

Jalgaon Politics : जळगाव जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना पक्षाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
उन्मेष पाटील यांनी यासंदर्भात अद्यापपर्यंत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली नसली तरी देखील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांचा प्रवेश होत असून प्रवेशाचा मुहूर्तही ठरला आहे. शुक्रवारी (दि. ६) मुंबईत हा पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटात जात असल्याच्या वृत्ताला स्वतः उन्मेष पाटील यांनी देखील दुजोरा दिला आहे.
बेलगंगा साखर कारखाना सुरु करण्यासाठीच्या आंदोलनामुळे उन्मेष पाटील प्रकाशझोतात आले होते. भाजपमध्ये अगदी तरुण वयातच त्यांना अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या मिळाल्या. 2014 मध्ये भाजपने त्यांना चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली तेव्हा ते विजयी होऊन आमदार झाले. त्यानंतर तर 2019 मध्ये भाजपने त्यांना लोकसभेला उमेदवारी दिली तेव्हाही ते निवडून आले व खासदार झाले. मात्र त्यानंतर २०२४ मध्ये भाजपने पुन्हा त्यांना संधी दिली नाही. भाजपने स्मिता वाघ यांना संधी दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या पाटलांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
उन्मेष पाटील यांना २०२४ मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उमेदवारी दिली. मात्र भाजपच्या मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला. राज्यात नुकत्याच झालेल्या नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्येही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे उन्मेष पाटील यांना विरोधी पक्षात राहूनच काम करावे लागत होते. अशा परिस्थितीत सत्ता नसल्याने कार्यकर्त्यांनाही कामे करताना अडणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पाटील यांना शिवसेनेत प्रवेश करावा, असा आग्रह धरल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे उन्मेष पाटील यांनाही आता सत्ता खुणावू लागल्याने त्यांनी सत्ताधारी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या एक-दोन दिवसात ते आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान पक्षप्रवेशासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांची चर्चा झाली आहे. त्याअगोदर जिल्ह्यातील शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे आमदार व काही पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी याविषयावर चर्चा केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.