Girish Mahajan & Kishor Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: महायुतीचा वाद; गिरीश महाजन यांनी आव्हान स्वीकारले, भाजप स्वबळावर सर्व जागा जिंकणार!

Jalgaon BJP politics heats up, MLA Kishore Patil's challenge of self-reliance, Girish Mahajan accepts the challenge -शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार किशोर पाटील यांच्या पाचोरा- भडगाव मतदारसंघात भाजप स्वबळावर सर्व जागा जिंकणार?

Sampat Devgire

Girish Mahajan News: जळगाव जिल्ह्यात महायुतीतील वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. आता मंत्री गिरीश महाजन यांनी सहकारी पक्षाचे आव्हान स्वीकारले आहे. त्यामुळे जळगावच्या आगामी निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची चिन्हे आहेत.

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबई वगळता अन्यत्र स्थानिक परिस्थितीनुसार महायुती भूमिका ठरवणार आहे.

या पार्श्वभूमीवर पाचोरा- भडगाव मतदारसंघात पहिली ठिणगी पडली होती. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने भाजप विरोधात भूमिका घेतली. आम्ही निवडणुकीविषयी भाजपच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला होता.

आमदार किशोर पाटील यांनी आपल्या विरोधात विधानसभा निवडणुकीला भाजपने कारस्थान केले, असा आरोप केला होता. आमदार पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी करणारे भाजपचे बंडखोर अमोल शिंदे यांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पाठबळ असल्याचा त्यांचा दावा होता. अन्य उमेदवारांनाही भाजप पक्षात प्रवेश दिल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला होता.

आमदार पाटील यांनी भूमिका जाहीर केल्यावर भाजपनेही आता त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. प्रारंभी आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार पाटील यांना डिवचले. आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील त्यांच्या मदतीला धावून आले आहे.

जलसंपदा मंत्री महाजन यांनी आमदार पाटील यांचे आव्हान स्वीकारल्याचे जाहीर केले. भाजप पाचोरा भडगाव मतदार संघात स्वबळावर निवडणुकीत उतरेल. स्वबळावर भाजप सर्व जागा जिंकेल, असा दावा मंत्री महाजन यांनी केला आहे.

मंत्री महाजन यांच्या या दाव्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीचे अन्य सहकारी पक्ष ही सावध झाले आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वी भाजपच्या भूमिकेवर सावध प्रतिक्रिया दिली होती. आता मात्र जळगाव जिल्ह्यात पाचोरा भडगाव मतदार संघात महायुतीतच फाटा फूट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT