Devyani Farande : महापालिकेला फरांदे ताईंचा झटका दाखवावा लागेल, निधी न दिल्याने आमदार संतापल्या..

MLA Devyani Farande criticized Nashik Municipal Corporation : गंगापूररोडवरील प्रमोद महाजन उद्यानाच्या लोकार्पणावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिकेला चांगलेच फैलावर घेतले.

MLA Devyani Farande
MLA Devyani Farande
Published on
Updated on

Nashik News : नाशिक शहरातील गंगापूररोडवरील प्रमोद महाजन उद्यानाच्या नुतणीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरु होते. ते काम दिवाळीत पूर्ण झाले. या उद्यानाचे लोकार्पण गुरुवारी (दि. २३) भाऊबीज पहाट या कार्यक्रमाच्या वेळी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, गायक सुरेश वाडकर आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत झाले.

या उद्यानाच्या नुतनीकरणासाठी आ. फरांदे यांनी शासनाकडून पाच कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध केला. परंतु महापालिकेकडे अनेकदा मागणी करूनही महापालिकेने एक रुपयाचाही निधी दिला नाही. त्यामुळे भर कार्यक्रमात आमदार फरांदे संतापल्या. त्यांनी महापालिकेला फरांदे ताईंचा झटका दाखवावा लागेल, असा इशाराच दिला.

यावेळी आमदार फरांदे यांनी महापालिकेला चांगलेच फैलावर घेतले. मागील अठरा वर्षात महापालिकेने एक रुपयाचाही निधी उपलब्ध करुन दिला नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. उत्तम सुविधा असलेले हे उद्यान आहे. परंतु त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिकेचे लक्ष नाही असं त्या म्हणाल्या.


MLA Devyani Farande
Nashik ZP : आमदार कांदेंकडून ठेकेदार पुतण्याचा पर्दाफाश, जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याने देवेंद्र कांदेंवर गुन्हा दाखल

उद्यानालगत ४० मीटर उंचीची संरक्षक भिंत होती. मागे पावसाळ्यात या भितींचा काही भाग कोसळला होता. अनेकदा मागणी करूनही महानगरपालिकेने ती भिंत बांधली नाही. शेवटी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली. शासनाकडून पाच कोटी रुपयांचा विशेष निधी आणून संपूर्ण उद्यानाचे नूतनीकरण केल्याचे त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना आमदार फरांदे म्हणाल्या, प्रमोद महाजन हे शहरातील सर्वात गर्दी असणारे उद्यान आहे. या उद्यानाची देखभाल दुरुत्तीकडे महापालिकेने लक्ष द्यायला हवं. सांगूनही ते होत नाही. एखाद्या दिवशी महापालिकेला फरांदे ताईंचा झटका दाखवावा लागेल. याबाबत खासगीत महानगरपालिकेचे अनेकदा कान टोचले असून जाहीरपणे टोचलेले बरे असते, असा टोला त्यांनी लगावला. यावर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आमदार फरांदे यांना प्रशासनाबाबत तक्रार करण्यास पुन्हा संधी मिळणार नाही, असे आश्वासन दिलं.


MLA Devyani Farande
Trimbakeshwar Railway Project : नवे संकट! एनएमआरडीए पाठोपाठ रेल्वेसाठी सर्वेक्षण, त्र्यंबकेश्वरचे शेतकरी हवालदिल

दरम्यान यावेळी आमदार फरांदे यांनी उद्यानाच्या वेगळेपणाची माहिती उपस्थितांना दिली. पद्मश्री श्री सुरेशजी वाडकर यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com