Bangladeshi Girl Found Living Illegally in Jalgaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Crime News : Instagram वर जडलेल्या प्रेमासाठी तरुणीने ओलांडली सीमा, विनापासपोर्ट भारतात प्रवेश केला अन् कुणकुण लागताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Jalgaon Crime News : Instagram वर जडलेल्या प्रेमासाठी सीमा ओलांडून भारतात विनापासपोर्ट प्रवेश करणं एका बांग्लादेशी तरुणीला महागात पडलं आहे. जळगाव पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत.

Ganesh Sonawane

Crime News : सोशल मीडियातून जुळणाऱ्या प्रेमसंबंधांसाठी सीमा ओलांडून भारतात येण्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. अशाच प्रकारातील एक धक्कादायक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झालेल्या 20 वर्षीय बांगलादेशी तरुणीने बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश करत थेट जळगाव गाठल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शनिपेठ पोलिसांनी तपास करत संबंधित तरुणीला ताब्यात घेतले असून, तिला आश्रय देणाऱ्या युवकाविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जळगाव शहरातील भोई गल्ली परिसरातील जोशी पेठ भागात एक परदेशी महिला बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान कोनिका राणी शामलचंद्र राय (वय 20) ही बांगलादेशी तरुणी आढळून आली. पोलिसांनी चौकशी केली असता तिच्याकडे भारतात वास्तव्यासाठी आवश्यक असलेले वैध पासपोर्ट अथवा व्हिसा नसल्याचे समोर आले.

पोलिसांनी कारवाई केल्यानंतर कोनिका राणी आणि चिन्मय यांनी आपण विवाह केल्याचा दावा केला. मात्र, त्यांच्या लग्नासंदर्भातील कोणतेही अधिकृत कागदपत्र किंवा कायदेशीर पुरावे सादर करता आले नाहीत. भारतात विनापरवाना वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी कोनिका राणी हिला ताब्यात घेतले असून, तिला आश्रय दिल्याप्रकरणी चिन्मय वाला याच्याविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या प्रकरणातील धक्कादायक बाब समोर आली आहे. जळगावातील सोने कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला आणि कोनिका राणी यांची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. कालांतराने या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. चिन्मयसोबत विवाह करण्याच्या उद्देशाने कोनिका हिने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बांगलादेशातून भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी इमिग्रेशन कायदा तसेच परदेशी नागरिक कायदा 2025 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, संबंधित तरुणीने सीमा ओलांडून भारतात प्रवेश कसा केला आणि या प्रवासादरम्यान तिला कोणाची मदत मिळाली होती का, याचाही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. सोन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT