Crime News : संतापजनक घटना : पन्नास वर्षीय नराधमाचा १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता चार महिन्यांची गर्भवती

Bhandara Sexual Assault Case : राज्यात अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच आता भंडारा जिल्ह्यात देखील अशीच संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
Sexual Assault
Sexual Assaultsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. घटनेचे स्वरूप: भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात भाजी मागण्यासाठी शेजारच्या घरी गेलेल्या १३ वर्षीय मुलीवर ५० वर्षांच्या व्यक्तीने अत्याचार केला.

  2. खुलासा: या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिल्याने तब्बल चार महिन्यांनंतर ही धक्कादायक घटना समोर आली.

  3. पोलीस कारवाई: लाखनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Bhandara Crime News : एकीकडे अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराचे प्रकरणांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून अशा नराधमांना फाशी देण्याची मागणी केली जात आहे. राज्यभर महिलावर्ग या मागणीसाठी रस्त्यावर उतरताना दिसत आहे. रविवरी (ता.१०) देखील पुण्यात मुक मोर्चा काढत महिलांनी नसरापूर घटनेतील आरोपीला फाशी देण्याची मागणी लावून धरली. यामुळे पुन्हा एकदा अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराचा मुद्दा चर्चेत आला असतानाच अशीच एक संतापजनक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात घडली आहे.

येथे एका ५० वर्षांच्या नराधमाने शेजारच्या घरी भाजी मागण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. यातून पीडित मुलगी आता गरोदर राहिली आहे. यानंतर आता हे प्रकरण उघडकीस आले असून या प्रकरणी लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलिसांनी पोक्सो’सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून रतनलाल ऊर्फ जागेश्वर सुरचंद कुळमते (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये पीडित मुलगी आरोपी कुळमते याच्या घरी भाजी मागण्यासाठी गेली होती. मात्र, आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला व आई-वडिलांना जीवे मारून टाकील, अशी धमकी दिली. यामुळे पिडिता दहशतीखाली होती.

Sexual Assault
Crime News : दुहेरी खून प्रकरणात नवा स्फोट! साक्षीदार हत्या कटात शिंदे शिवसेनेच्या नेत्याला अटक

दरम्यान काही दिवसांपूर्वी तिच्या प्रकृतीत बदल जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी वैद्यकीय तपासणी केली. यात ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या धक्क्यातून सावरत पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे पन्नास वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार लाखनी पोलिसांनी आरोपी रतनलाल कुळमते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुभाष बारसे करीत आहेत.

राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असताना भंडाऱ्यातील या घटनेमुळे जिल्हाभर संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि अशा घटनांना आळा बसावा यासाठी शासनाने अधिक कठोर कायदे करावेत, अशी मागणी होत आहे.

दरम्यान अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची एक धक्कादायक घटना अकोला शहरातूनही समोर आली आहे. मोठी उमरी परिसरात एका सहा वर्षीय चिमुकलीवर नात्यातीलच अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. या प्रकरणात सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप संबंधित महिलेने केला आहे.

पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिने ५ मे रोजी लेखी तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तसेच काही राजकीय व्यक्ती आणि नातेवाइकांकडून तक्रार चिमुकलीवरील अत्याचाराच्या दाखल न करण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचाही आरोप तिने केला आहे.

पोलिसांकडून दाद मिळत नसल्याने महिलेने जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे धाव घेतली. मात्र, त्यांनी पुन्हा सिव्हिल लाइन्स पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिल्याचे महिलेचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक मालती कायटे यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, संबंधित महिलेची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिस तयार होते.

मात्र, तक्रारीवर स्वाक्षरी करण्यात आली नसल्याने पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. महिलेला पुन्हा बयाण नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले असून, त्या आल्यास पुढील कारवाई करण्यात येईल. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच पातूर तालुक्यात एका दहा वर्षीय मुलीवरील अत्याचाराची घटना समोर आली होती.

Sexual Assault
Crime News : मीरा-भाईंदरमध्ये मोठी कारवाई, अमली पदार्थांची विक्री करणारी टोळी जेरबंद; तब्बल 13 कोटींचे एमडी जप्त!

FAQs :

१. ही घटना नेमकी कुठे घडली आहे? ही घटना महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील एका गावात घडली आहे.

२. पीडित मुलीचे वय किती आहे? पीडित मुलगी अवघ्या १३ वर्षांची (अल्पवयीन) आहे.

३. ही घटना उघडकीस कशी आली? अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिल्याने आणि तिची प्रकृती बिघडल्याने चार महिन्यांनंतर ही घटना उघडकीस आली.

४. आरोपीवर कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत? आरोपीवर 'पोक्सो' (POCSO) कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

५. आरोपीचे वय काय आहे आणि तो पीडितेचा कोण लागतो? आरोपी ५० वर्षांचा असून तो पीडित मुलीच्या शेजारी राहणारा इसम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com