JDCC Bank Election | जळगाव जिल्हा बॅंक  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी! 12 उमेदवार बिनविरोध; शिवसेनेने मारली मोठी मुसंडी, भाजपलाही टाकलं मागे

Jalgaon DCC Bank Election: 12 Candidates Elected Unopposed : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या दिवशी मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. महायुतीचे ११ उमेदवार बिनविरोध झाले असून त्यात शिवसेनेचे सर्वाधिक ६ उमेदवार बिनविरोध झाले.

Ganesh Sonawane

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा बिनविरोध पॅटर्न पाहायला मिळाला. अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत महायुतीच्या एकुण 12 जागा बिनविरोध झाल्या. यात, सर्वाधिक शिवसेनेच्या 6, भाजप ४ तर राष्ट्रवादीच्या 2 जागा बिनविरोध झाल्या.

बिनविरोध झालेले महायुतीचे उमेदवार

शिवसेना (शिंदे गट)

१.मंत्री गुलाबराव पाटील

२.आमदार चंद्रकांत सोनवणे

३.सुमित किशोर पाटील

४.मृणाल अमोल पाटील

५.नलिनी चिमणराव पाटील

६.सोमसिंग खुमानसिंग पाटील

भाजप

१.मंत्री गिरीश महाजन

२.रोहित निकम

३.रजनी सावकारे

4.मधुकर राणे

राष्ट्रवादी (अजित पवार गट)

१.सोनल संजय पवार

२.जयश्री अनिल पाटील

मंगळवार (दि.१७) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. सकाळी अकरा वाजेनंतर उमेदवारांची माघारीसाठी रिग लागण्याचे पाहायला मिळाले. शेवटच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांचाही बिनविरोधाचा मार्ग मोकळा झाला. विशेषत:शिवसेनेने मोठी मुसंडी मारली असून मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेच्या ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. भाजपच्या ४ व राष्ट्रवादीच्या २ जागा बिनविरोध झाल्याने आता जिल्हा बॅंकेच्या उर्वरित ९ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे.

जळगाव तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. विशेषत: गुलाबरावांच्या विरोधात भाजपच्या जयश्री महाजन आणि प्रभाकर सोनवणे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. कुलभूषण पाटील यांनीही उमेदवारी अर्ज आधीच मागे घेतला होता. तीन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने गुलाबराव पाटलांचा बिनविरोधचा रस्ता मोकळा झाला. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. शिवसेनेने बिनविरोधच्या बाबतीत भाजपलाही मागे टाकलं.

पाचोरा विकास सोसायटी मतदारसंघात महायुतीत मोठा तिढा निर्माण झाला होता. या मतदारसंघातून शिवसेना आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील रिंगणात उतरले होते. भाजपला देखील ही जागा हवी होती. मात्र, अखेरच्या दिवशी भाजपचे सतीश शिंदे यांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे सुमित पाटील यांची देखील बिनविरोध निवड झाली.

याशिवाय शिवसेनेचे उमेदवार आमदार चंद्रकांत सोनवणे, मृणाल अमोल पाटील, नलिनी चिमणराव पाटील, सोमसिंग खुमानसिंग पाटील हेही बिनविरोध झाले आहेत.

तर, भाजपचे कार्यकर्ते तुकाराम विठोबा निकम यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा झाला. निकम यांनी महाजन यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. भाजपचे जामनेर मधून गिरीश महाजन, चोपडा येथून रोहित निकम, भुसावळ येथून रजनी सावकार यांची बिनविरोध निवड झाली. तसेच भाजपचे मधुकर राणे देखील बिनविरोध झाले.

राष्ट्रवादी (अजित पवार गटमधून) शेवटच्या दिवशी धरणगाव येथून सोनल संजय पवार यांची बिनविरोध निवड झाली. तर माघारीच्या एक दिवस आधी अमळनेरमधून जयश्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT