Gulabrao Patil : गिरीश महाजन संकटमोचक पण लय लफडेबाज माणूस, 'दोन दोन लफडी...' म्हणत गुलाबरावांची फटकेबाजी

Gulabrao Patil On Girish Mahajan : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर मिश्किल शब्दांत टोलेबाजी केली.
Gulabrao Patil, Girish Mahajan
Gulabrao Patil, Girish MahajanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon DCC Bank Election : शिवसेनेचे नेते व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे खास खान्देशी शैलीतील मिश्किल आणि रोखठोक भाषणांसाठी ओळखले जातात. आता जळगावात जिल्हा बॅंक निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून निवडणुकीतील घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच त्यांचे नाव घेत मिश्किल फटकेबाजी केली आहे.

जळगाव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वार्षिक सभेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन हे संकटमोचक आहेत, पण लय लफडेबाज माणूस आहे अशी मिश्किल टिपणी केली. सभागृहात यावेळी जोरदार हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. मंत्री गिरीश महाजन देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थितीत होते. गुलाबराव पाटलांच्या फटकेबाजीपुढे महाजनांना देखील हसू आवरले नाही.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत माघारीच्या राजकारणावरुन महायुतीत घडामोडी सुरु आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गुलाबराव पाटील यांच्या समोर भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. गुलाबराव पाटील यांच्यासमोर भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज आहेत, त्यामुळे महाजनांनी दोन-दोन लफडी करुन ठेवल्याचे मिश्किल विधान गुलाबराव पाटील यांनी केले. भाजपच्या दोन्ही उमेदवारांची माघार व्हावी म्हणून मंत्री गुलाबराव पाटलांनी गिरीश महाजन यांना आवाहन केलं.

Gulabrao Patil, Girish Mahajan
Jalgaon DCC Bank Election : सुप्रिया सुळेंचा गिरीश महाजनांना फोन, जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार?

उद्या दोन जणांची माघार घ्यायची आहे, दोघेही भाजपचे आहे. मंत्री गिरीश भाऊंनी ती माघार करुनही टाकली. हा मोठा कठीण आणि संकटमोचक माणूक आहे. पण, लय लफडेबाज माणूस आहे असही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. गिरीश महाजन यांच्या राजकीय कौशल्यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या मिश्किल विधानावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत, हास्याने दाद दिली.

भाषणादरम्यान गुलाबराव पाटील यांनी औषध विक्रेते आणि लोकप्रतिनिधींच्या कामाची तुलना करताना सांगितले की, औषध विक्रेत्यांवर नागरिकांचा विश्वास असतो. लोक अनेकदा डॉक्टरकडे न जाता थेट मेडिकलमधून डोकेदुखी किंवा तापाच्या गोळ्या घेतात, त्यामुळे तुम्ही अर्धे डॉक्टरच आहात.

दुसरीकडे, आमदारांना 'जनरल फिजिशियन'प्रमाणे काम करावे लागते. कोणाची बायको नांदत नसेल तर मुलीच्या आईला समजावून सांगावे लागते. दोघांमध्ये तडजोड घडवून आणण्याच्या 'समाधानाच्या गोळ्या' आम्हाला द्याव्या लागतात अशी कोपरखळी त्यांनी मारली.

Gulabrao Patil, Girish Mahajan
Jalgaon DCC Bank Election : भाजप उमेदवाराची माघार, राष्ट्रवादीच्या आमदाराची पत्नी बिनविरोध ; जळगाव जिल्हा बँकेत राजकीय समीकरणे फिरली

औषध विक्रेत्यांचे आयुष्य तुलनेने निवांत असल्याने त्यांना बीपी किंवा शुगरचा त्रास कमी असतो. मात्र, राज्यातील 288 आमदारांपैकी तब्बल 212 आमदारांना बीपी आणि शुगर हे दोन्ही आजार मावसभावांप्रमाणे एकत्र चिकटलेले आहेत, असे सांगत त्यांनी राजकारणातील ताणतणावावर भाष्य केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.