MLA Kishor Patil, Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon DCC Bank : एकनाथ शिंदेंच्या आमदाराच्या लेकाचा अर्ज अवैध ठरल्याने धक्का; महायुतीत पुन्हा मिठाचा खडा

Jalgaon DCC Bank election, Kishor Patil, Eknath Shinde, Shiv Sena, Mahayuti alliance : पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांनी भाजप विरोधात जोरदार मोर्चे बांधणी केली होती. मात्र त्यांचे चिरंजीव सुमित पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.

Sampat Devgire

Jalgaon Politics : जळगाव जिल्हा बँकेचे राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने प्रत्येक नेता आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करीत आहे. यामध्ये महत्त्वाच्या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला.

बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. त्यांचा मुलगा संग्राम पवार आणि पत्नी सोनाली पवार यांच्या अर्जावर देखील हरकती घेण्यात आल्या. मात्र त्या हरकती फेटाळल्याने पवार यांना किंचित दिलासा मिळाला.

बँकेचे अध्यक्ष संजय पवार सलग दहा वर्षे संचालक असल्याने नव्या नियमाचा त्यांना मोठा फटका बसला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी त्यांचा अर्ज बाद केला. त्यामुळे संजय पवार यांच्या विरोधकांना बळ मिळाले.

पाचोर्‍याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजप विरोधात जोरदार मोर्चे बांधणी केली होती. मात्र त्यांचे चिरंजीव सुमित पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. सोमवारी त्याबाबतचा निर्णय झाला होता. त्याची सुनावणी मंगळवारी झाली.

अर्ज अवैध ठरल्याने सुमित पाटील चांगलेच संतापले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दारावर लाथा मारून त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात महायुतीत मिठाचा खडा पडला.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा अर्ज मुक्ताईनगर गटातून वैध ठरला आहे. या अर्जावर देखील हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यांचे विरोधक विनोद तराळे आणि देवयानी देशमुख यांचे अर्जही वैध ठरले आहेत. त्यामुळे मुक्ताईनगर मतदार संघात चांगलीच चुरस असेल.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचा अर्ज सोमवारी अवैध ठरविण्यात आला होता. जळगाव जिल्हा बँकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आघाडी घेतली. त्या तुलनेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांना मात्र अर्ज बाद ठरल्याने धक्का बसला आहे. त्यामुळे निवडणुकीत पॅनल निर्मिती कशी होणार, महायुतीतच कुरघोडीचे राजकारण कसे रंगते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT