Devendra Fadnavis Defuses Savarkar Political Row Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis Politics: सावरकर वादावर देवाभाऊंनी टाकला पडदा; अजित दादांना घेतले सावरून!

Devendra Fadnavis puts end to Savarkar controversy: आमदार आशिष शेलार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सावरकरांच्या विधानावरून वाद रंगला होता.

Sampat Devgire

BJP-NCP Dispute News: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानावरून ऐन निवडणुकीत वाद पेटला होता. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते. यामध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी विधान केले होते. विधानावरून निवडणुकीच्या प्रचारात वेगळाच वाद निर्माण झाला. त्यामुळे गेल्या दोन दिवसात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र रंगले होते.

आता या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या भूमिकेवर त्यांनी मत प्रदर्शन केले. त्यामुळे आता हा वाद मिटण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कधीही सहन करणार नाही. भाजप या संदर्भात अतिशय आग्रही आहे. राजकीय वाद बाजूला ठेवून सावरकरांचा सन्मान झालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी सावरकरांविषयी केलेले विधान वादात सापडले होते. असा वाद निर्माण होता कामा नये. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सावरकरांविषयी काही अवमान जनक वक्तव्य केल्याचे आपल्याला ज्ञात नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. या संदर्भात जळगाव शहरात काल रोड शो झाला. मुख्यमंत्र्यांच्या या रोड शोच्या माध्यमातून भाजपने निवडणुकीचे शक्ती प्रदर्शन केले.

लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आहे. माजी मुख्यमंत्री (कै) विलासराव देशमुख यांच्याबाबत चव्हाण यांनी वक्तव्य केले होते. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी आता पडदा टाकला आहे. विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे त्यांच्याबद्दल भाजप सह सामान्य जनतेत देखील मोठा आदर आहे असे स्पष्टीकरण चव्हाण यांच्या वक्तव्यावर त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT