Arvind Sawant Politics: नाशिकला मालकही नाही अन् पालकही नाही, जामनेरहून आयात भाजपच्या कारभाऱ्याने लावली वाट!

Nashik has no guardian minister Arvind Sawant claim: नाशिक गुन्हेगार मुक्त करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे हाच आता पर्याय, असल्याचा दावा खासदार अरविंद सावंत यांनी केला.
Arvind Sawant
Arvind SawantSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Shivsena News: महापालिका निवडणुकीवरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. भाजप गुन्हेगारांच्या माध्यमातून महापालिका ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. हा प्रयत्न उद्धव ठाकरेंची शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी नाशिक महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला. शहरात भाजपने गेली पाच वर्ष विकासाच्या नावाखाली दुरावस्था केली. गुन्हेगारांना पोचण्याचे काम सत्ताधारी भाजपने केले, असा आरोप सावंत यांनी केला.

आगामी काळात शहरातील महिला आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले टाकावे लागतील. त्यासाठी शहर हित डोळ्यापुढे ठेवून मतदारांनी विचार करावा. भाजपला चुकूनही मतदान झाले तर शहर असुरक्षित होईल, असा इशारा त्यांनी दिला.

Arvind Sawant
Arvind Sawant Politics: अरविंद सावंत यांनी सुधाकर बडगुजर प्रकरणावरून भाजपची लाज काढली; म्हणाले, आता सलीम कुत्ताची मांजर केली का?

महापालिका निवडणुकीत भाजपचा एबी फॉर्म वाटपाचा गोंधळ चर्चेत आहे. याबाबत भाजपच्या निष्ठावंतांनी ही गंभीर आरोप केले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रारी करण्यात आल्या आहेत.

Arvind Sawant
NCP leader joins BJP : निवडून येईपर्यंत पवारसाहेब, पण सत्तेशिवाय शहाणपण नाही? गटनोंदणीवेळी भाजपला 'वंदन'!

यावरून शिवसेना ठाकरे पक्षानेही भाजपवर आरोपाचा बॉम्ब टाकला. महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार ठरवण्याचे काम कंत्राटदारांनी केले. भाजपच्या एबी फॉर्म चे वाटप कंत्राटदारांच्या घरून झाले, असा गंभीर आरोप अरविंद सावंत यांनी केला.

भाजपने नुकताच शहरात गुंडांचा मेळावा घेतल्याचा आरोप करण्यात आला. नाशिक शहराची संस्कृती बिघडविण्याचा ठेका भाजपने काही लोकांना दिला आहे. निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सत्तेत येण्याचा चंग या पक्षाने बांधला आहे.

आगामी काही दिवसात नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर निवडणुकीतील गैरप्रकार करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. नागरिकांनी त्याबाबत स्वतः जागरूक रहावे. कोणत्याही चुकीच्या गोष्टीला किंवा आमिषाला बळी न पडता भाजपला धडा शिकवावा. अन्यथा आगामी कालावधीत नाशिक शहरात गुन्हेगारीचा कब्जा पुन्हा वाढेल, असा इशारा देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com