NCP leader joins BJP : निवडून येईपर्यंत पवारसाहेब, पण सत्तेशिवाय शहाणपण नाही? गटनोंदणीवेळी भाजपला 'वंदन'!

Pathardi Municipal Council: BJP Group Registration at Ahilyanagar Collector Office, Vandana Teke Joins BJP : पाथर्डी नगरपालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांच्या गटनोंदणीवेळी शरद पवार राष्ट्रवादीच्या नगरसेविकेने भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय कलाटणी घेतली.
Monika Rajale
Monika RajaleSarkarnama
Published on
Updated on

Pathardi municipal politics : राज्यातील नगरपालिका निवडणुका झाल्या आहेत, नवनिर्वाचित नगराध्यक्ष आपले पदाभार स्वीकारत आहेत. सत्ताधारी अन् विरोधक गटनोंदणीत व्यग्र आहेत. पण सत्तेचा मोह विरोधक नगरसेवकांना खुणवत असतो. त्याचाच प्रत्यय, पाथर्डी नगरपालिकेत आला आहे. इथं भाजप एकहाती सत्तेत आला आहे.

पण सत्ताधारी गट सदस्य नोंदणी करत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविकेने विरोधी बाक सोडून देत, सत्ताधारी बाक पकडला आहे. सत्ताधारी भाजपच्या गटनोंदणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडून आलेल्या वंदना टेके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वंदना टेके यांनी सत्तेसाठी घेतलेल्या 'यु-टर्न'मुळे पाथर्डीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसंच राज्यातील विरोधकांना देखील अलर्ट केलं आहे.

पाथर्डी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून निवडून आलेल्या नगरसेविका वंदना टेके यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या भाजपच्या गटनोंदणीवेळी प्रवेश केला. वंदना टेके यांच्या या निर्णयामुळे नगरपालिकेतील भाजपचे संख्याबळ आणखी एकने वाढले आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या दोन्ही जागा तसेच सर्व समित्यांवरील अध्यक्षपदे भाजपकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अधिकृत गटनोंदणीमध्ये भाजपने (BJP) डॉ. शारदा गर्जे यांची गटनेतेपदी निवड केली. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पदासह एकूण 15 जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पाच, तर एक जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

Monika Rajale
Vilasrao Deshmukh controversy : रवींद्र चव्हाणांनी लावलेल्या आगीवर बच्चू कडूंचा संताप; म्हणाले, 'दहा जरी पैदा झाले तरी..'

पालिकेतील संख्याबळ लक्षात घेता, स्वीकृत नगरसेवकांच्या दोन जागा व विविध समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी भाजपला केवळ एका अतिरिक्त सदस्याची गरज होती. याच पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख पक्षांनी अपक्ष नगरसेविका दीपाली बंग यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व नगरसेवकांशी चर्चा केल्याचेही समजते.

Monika Rajale
Bachchu Kadu On Sangram Jagtap : 'जसा गुरू तसा चेला'; बच्चू कडूंचा जगतापांच्या लोकांच्या दहशतीवर 'प्रहार'

दरम्यान, नगरसेवक बजरंग घोडके यांच्या पुढाकाराने आणि आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थित वंदना टेके यांनी अखेर भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून कोष्टी समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या पार्श्वभूमीवर टेके यांना उपनगराध्यक्ष करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पक्षाला अपेक्षित संख्याबळ न मिळाल्याने ते शक्य झाले नव्हते.

आता भाजपकडून वंदना टेके यांना उपनगराध्यक्षपद देण्यात येणार की, एखाद्या महत्त्वाच्या समितीचे अध्यक्षपद सोपवले जाणार, याकडे पाथर्डी पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, वंदना टेके यांनी बदलेल्या राजकीय भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून काही कारवाई होते का, याकडे देखील लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com