Kishore Patil News: जळगाव जिल्हा बँकेत महायुतीने पॅनेल जाहीर केला. बारा जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. पाचोरा भडगाव मतदार संघात मात्र वाद टोकाला पोहोचला आहे.
विधानसभा निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांच्या पराभवासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले. त्याचे पडसाद नगरपालिका निवडणुकीत उमटले. आता जिल्हा बँकेतही यावरून मोठी राजकीय धुमश्चचक्री उडाली आहे.
पाचोरा भडगाव कटात आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा अर्ज बाद करण्यासाठी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पूर्ण ताकद पणाला लावली. या राजकीय डावपेचाचा उलटा परिणाम झाल्याचे दिसते. आता शिवसेनेने थेट भाजपला आव्हान दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी किशोर पाटील यांना आव्हान दिले होते. आमदार चव्हाण यांनी भाजप तर्फे बँक निवडणुकीसाठी युती संपली असे जाहीर केले. त्याला आमदार किशोर पाटील यांनी तेवढ्याच आक्रमकपणे उत्तर दिले आहे.
आमदार किशोर पाटील यांनी भाजपला तेवढ्याच प्रखरपणे उत्तर दिले. आपण स्वतःच भाजपशी युती करण्यास उत्सुक नाही. त्यामुळे युतीसाठी चर्चेची दारे मी स्वतः बंद ठेवली आहे. झोपणे चर्चेची तयारी ठेवली असली तरी मी त्याला नकार देतो, अशी घोषणा आमदार पाटील यांनी दिली.
आमदार किशोर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपने खेळलेली चाल देखील उघड केली. जपानी विधानसभा निवडणुकीत अमोल शिंदे यांना आपल्या विरोधात दोनदा अपक्ष उमेदवारी दिली. शिंदे यांना सर्व प्रकारची रसद आणि आर्थिक ताकद पुरवली. त्यामुळे भाजपने युतीचे सर्व संकेत मोडले आहेत.
निवडणुकीत पराभव झाल्यावर अमोल शिंदे यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांचे मोठे पद देऊन पुनर्वसन करण्यात आले. महायुतीच्या संकेतानुसार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या आश्वासनाचे यामध्ये भंग झाले आहे. त्यामुळे आधी मंगेश चव्हाण यांनी त्याचे उत्तर द्यावे. नंतरच आपण आगामी निवडणुकांसाठी महायुती करायची की नाही याचा विचार करू असे शिवसेनेचे आमदार पाटील म्हणाले.
शिवसेनेचे आमदार पाटील आणि भाजपचे आमदार चव्हाण यांच्यातील राजकीय वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्याचा परिणाम म्हणजे पाचोरा भडगाव येथे महायुती मोडली. आगामी निवडणुकांसाठी तरी ही युती पुन्हा होणार का यावरून आता राजकीय तर्क लढविले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.