Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडीला आता सर्वपक्षीय बंडखोरांचे आव्हान

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने माघार घेतली आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या ‘सहकार’ पॅनेलमधून उमेदवारी न मिळालेले नाराज, तसेच भाजपमधील काही नाराज उमेदवारांनी सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ पॅनेलची स्थापना केली आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत या दोन्ही पॅनेलमध्ये चुरस बघावयास मिळणार आहे. दरम्यान, सहकार पॅनेलला ‘कपबशी’ तर, शेतकरी विकास पॅनेलला ‘मोटारगाडी’ हे चिन्ह मिळाले आहे. (Jalgaon District Bank Election: Mahavikas Aghadi challenged by all-party rebels)

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीची कागदावरची रणधुमाळी संपली असून, आता थेट मतदारांमध्ये जावून आपले भाग्य आजमाविण्याची लढत रंगणार आहे महाविकास आघाडीतर्फे ‘सहकार’पॅनलची स्थापना करण्यात आली आहे. या पॅनेलचे उमेदवार असे : अनुसूचित जाती, जमाती मतदार संघ : श्‍यामकांत बळीराम सोनवणे (शिवसेना), वि.जा.भ.ज.- मेहताबसिंग रामसिंग नाईक (राष्ट्रवादी), इतर मागासवर्ग- डॉ. सतीश भास्करराव पाटील (राष्ट्रवादी), महिला राखीव- ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर (राष्ट्रवादी), शैलजादेवी दिलीप निकम (कॉंग्रेस), इतर संस्था मतदार संघ- गुलाबराव बाबुराव देवकर (राष्ट्रवादी), रावेर विकासो- जनाबाई गोंडू महाजन (कॉंग्रेस), यावल विकासो- विनोदकुमार पंडीतराव पाटील (कॉंग्रेस), चोपडा विकासो- घनश्‍याम ओंकारदास अग्रवाल(राष्ट्रवादी).

सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेल

भाजपसहीत सर्वच पक्षांमधील नाराज उमेदवारांनी ‘शेतकर विकास पॅनल’ची स्थापना केली आहे. त्यांचे उमेदवार असे : अनुसूचित जाती जमाती मतदार संघ- ज्ञानदेव भगवान बाविस्कर (राष्ट्रवादी), वि.जा.भ.ज.- विकास ज्ञानेश्‍वर वाघ (राष्ट्रवादी), इतर मागास प्रवर्ग- विकास मुरलीधर पवार (राष्ट्रवादी), महिला राखीव- कल्पना शांताराम पाटील (राष्ट्रवादी), अरूणा दिलीपराव पाटील (कॉंग्रेस), इतर संस्था- रवींद्र सूर्यभान पाटील (भाजप), रावेर विकासो-राजीव रघुनाथ पाटील (कॉंग्रेस), चोपडा विकासो- सुरेश शामराव पाटील (कॉंग्रेस).

भाजप आमदार मात्र स्वतंत्र

भारतीय जनता पक्षाने या निवडणूकीतून माघार घेतली आहे. परंतु, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची उमेदवारी कायम आहे. भाजपसहित नाराज असलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांचे शेतकरी विकास पॅनेल स्थापन करण्यात आले असले, तरी भाजपचे सावकारे मात्र या पॅनेलमध्ये नाहीत. ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असून, त्यांचे निवडणूक चिन्ह ‘विमान’ आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT