माजी आमदार कदमांचे सुपुत्र नगरपालिकेऐवजी झेडपीतून सुरू करणार राजकीय इनिंग

नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या वर्गासाठी पडले तर अजिंक्य कदम यांना नगराध्यक्षपदाची लॉटरी लागेल.
Ajinkya Kadam
Ajinkya KadamSarkarnama
Published on
Updated on

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांचे पुत्र ॲड. अजिंक्य कदम चिपळूण नगरपालिकेऐवजी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. रमेश कदम यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (Former NCP MLA Ramesh Kadam's son Ajinkya Kadam to contest Ratnagiri ZP election)

माजी आमदार रमेश कदम यांचे राजकीय वारसदार म्हणून अजिंक्य कदम यांच्याकडे पाहिले जाते. रमेश कदम यांची राजकीय सुरूवात चिपळूण नगरपालिकेतून झाली. कॉंग्रेसनंतर राष्टवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून तब्बल ४२ वर्षे त्यांच्याकडे चिपळूण नगरपालिकेची सत्ता होती. ते १३ वर्ष चिपळूणचे नगराध्यक्ष होते, त्यानंतर चिपळूण विधानसभा मतदारसंघातून ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. मागील पाच वर्ष कदम हे नगरपालिकेच्या सत्तेपासून दूर राहिले आहेत. मात्र, आगामी निवडणुकीसाठी ते पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांचे राजकीय वारसदार अजिंक्य कदमही या वेळी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.

Ajinkya Kadam
संग्रामसिंह कुपेकरांचे अपिल फेटाळले अन्‌ आमदार राजेश पाटील नॉट आऊट राहिले!

रमेश कदम यांनी चिपळूण शहरातून राजकारणाला सुरुवात केली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अजिंक्य शहरातून राजकारणात सक्रिय होतील, असे सर्वांनाच वाटले होते. त्यांच्यासाठी बहादूरशेख नाका परिसरातील सुरक्षित प्रभागाची चाचपणी झाली होती. परंतु अजिंक्यने जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. पोफळी गटातून रत्नागिरी जिल्हा परिषदेत जाण्याची त्याची इच्छा आहे. त्यांचा हा निर्णय सर्वांसाठी धक्कादायक मानला जात आहे.

Ajinkya Kadam
‘पीएमआरडीए’च्या निवडणुकीत मताला दहा हजारांचा भाव फुटल्याची चर्चा...

चिपळूण शहरात कॉंग्रेसबरोबर आघाडी झाली तर राष्ट्रवादीला नगरपालिकेची सत्ता सहज मिळेल. नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या वर्गासाठी पडले तर अजिंक्य कदम यांना नगराध्यक्षपदाची लॉटरी लागेल. उपनगराध्यक्षपद किंवा विषय समितीचे सभापतिपदही त्यांना सहज मिळेल. रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेना इतर कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी न करता सत्तेत येण्याची शक्यता आहे, तसे झाले तर अजिंक्य कदम यांना जिल्हा परिषद सदस्य किंवा विरोधी पक्षनेतेपद वगळता अन्य कोणतेही पद मिळण्याची शक्यता नाही.

Ajinkya Kadam
खासदार होताच अवघ्या अडीच वर्षांतच अमोल कोल्हेंवर एकांतवासाची वेळ का आली?

अजिंक्य कदम वकील आहे. आपल्या राजकीय करिअरची सुरूवात पालिकेतून करायची की जिल्हा परिषदेतून याचे सर्वस्वी अधिकार त्याला आहेत. परंतु त्याने जिल्हा परिषदेत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्ष देईल त्या ठिकाणाहून तो निवडणूक लढवेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com