Jalgaon Dudh Sangh election Social media
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Dudh Sangh : महाजन-पाटलांनी उलथवली खडसेंची सत्ता; भाजप-शिंदे गटाला १५, तर महाआघाडीला ५ जागा

खडसेंच्या पत्नी तथा दूध संघाच्या विद्यमान अध्यक्ष मंदाकिनी खडसेंचा भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून पराभव झाला.

कैलास शिंदे

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्हा दूध संघाच्या (Dudh Sangh) चुरशीच्या निवडणुकीत (Election) ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) गटाने तब्बल १५ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) गटाला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले. खडसेंच्या पत्नी तथा दूध संघाच्या विद्यमान अध्यक्ष मंदाकिनी खडसेंचा (Mandakini Khadse) भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्याकडून पराभव झाला. (Jalgaon Dudh Sangh elections, BJP-Shinde group won 15 seats, while Maha Aghaad won 5 seats)

जळगाव जिल्हा दूध संघात खरी लढत भाजप-शिंदे गट विरूध्द महाविकास आघाडी अशीच झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्या पत्नी छाया देवकर या महिला राखीव गटातून विजयी झाल्या होत्या. राष्ट्रवादीचे अमंळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील विजयी झाले. मात्र राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील अवघ्या चार मतांनी पराभूत झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांचा शिवसेना (शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी पराभव केला. ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील मोठ्या फरकाने विजयी झाले. जिल्हा बँकेचे संचालक राष्ट्रवादीतून भाजप-शिंदे गटाकडे गेलेले संजय पवार हे २६९ मिळवून विजयी झाले.

गटनिहाय विजयी उमेदवार : अमळनेर-आमदार अनिल भाईदास पाटील (महाविकास आघाडी, २४६ मते विजयी) पराभूत स्मिता उदय वाघ (भाजप-शिंदेगट १८४ मते), भडगाव- भोसले रावसाहेब प्रकाश (भाजप-शिंदे गट-२३३ मते, विजयी), पराभूत पाटील संजीव कृष्णराव (महाविकास आघाडी, २०० मते), भुसावळ- ढाके शालिनी मधुकर (महाविकास आघाडी, १६९ मते पराभूत), झांबरे श्‍यामल अतुल (भाजप शिंदे गट, २६३ मते, विजयी). बोदवड- पाटील रवींद्र प्रल्हादराव (महाविकास आघाडी, २१६ मते पराभूत), राणे मधुकर रामचंद्र (शिंदे भाजप गट, २२० मते विजयी), चाळीसगाव- प्रमोद पांडुरंग पाटील (महाविकास आघाडी, २४७ मते, विजयी), सुभाष नानाभाऊ पाटील (भाजप-शिंदे गट १८८, पराभूत) चोपडा- निकम रोहित दिलीप (भाजप-शिंदे गट, २६९ मते, विजयी), पाटील इंदिराताई भानुदास (महाविकास आघाडी, १६४ मते पराभूत), धरणगाव- पाटील वाल्मीक विक्रम (महाविकास आघाडी १६७ मते पराभूत), पवार संजय मुरलीधर (भाजप-शिंदे गट, २६९ मते विजयी).

एरंडोल- दगडू धोंडू चौधरी (भाजप-शिंदे गट, २६० मते विजयी), जैन भागचंद मोतीलाल (महाविकास आघाडी,२०५ मते पराभूत), जळगाव- महाजन मालती सुपडू (महाविकास आघाडी, १६२ मते पराभूत), पाटील गुलाबराव रघुनाथ (भाजप-शिंदे गट, २७५ मते विजयी). जामनेर- महाजन गिरीश दत्तात्रय (भाजप-शिंदे गट, २७६ मते, विजयी), दिनेश रघुनाथ पाटील (महाविकास आघाडी, १५८ मते पराभूत), मुक्ताईनगर- खडसे मंदाकिनी एकनाथ- (महाविकास आघाडी, १७९ मते पराभूत), चव्हाण मंगेश रमेश (भाजप-शिंदे गट, २५५ मते विजयी), पारोळा-पाटील सतीश भास्करराव (महाविकास आघाडी, २०८ मते, पराभूत), पाटील चिमणराव रूपचंद (भाजप-शिंदे गट, २२७ मते (विजयी). रावेर- बढे जगदीश लहू (महाविकास आघाडी, १७० मते पराभूत), ठकसेन भास्कर पाटील-(भाजप-शिंदे गट, २६६ मते, विजयी), यावल- चौधरी हेमराज खुशाल (महाविकास आघाडी, १६८ मते पराभूत), चौधरी नितीन नारायण-(भाजप-शिंदे गट, २६० मते, विजयी).

विमुक्त जाती-भटक्या जमाती : देशमुख अरविंद भगवान (भाजप शिंदे गट, २५९ मते विजयी), विजय रामदास पाटील (महाविकास आघाडी, १७९ मते पराभूत), अनुसूचित जाती जमाती : ब्रम्हे श्रावण सदा (महाविकास आघाडी, १६१ मते पराभूत), संजय वामन सावकारे (भाजप-शिंदे गट, २७६ मते, विजयी). इतर मागास वर्ग : भंगाळे गोपाळ रामकृष्ण (भाजप शिंदे गट, २०७ मते, पराभूत), पराग वसंतराव मोरे (महाविकास आघाडी, २३० मते, विजयी). महिला राखीव : छाया गुलाबराव देवकर (महाविकास आघाडी, २३५ मते विजयी), पूनम प्रशांत पाटील (भाजप शिंदे गट, २५७ मते, विजयी). सुनीता राजेंद्र पाटील (भाजप-शिंदे गट १९२ मते पराभूत), उषा विश्‍वासराव पाटील (अपक्ष, शून्य मते, पराभूत), मनीषा अनंतराव सूर्यवंशी (महाविकास आघाडी, १६४ मते, पराभूत)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT