Shinde Government : ज्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्याच दिवशी शिंदे सरकार पडणार : या नेत्याचा खळबळजनक दावा

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर मारामारी होईल, हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही.
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

इंदापूर (जि. पुणे) : मंत्रीमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) झाला की शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) कोसळणार आहे, त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला. (The day cabinet is expanded, the same day Shinde government will collapse : Amol Mitkari)

इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित शरद कृषी महोत्सव 2022 अंतर्गत युवा महोत्सवाच्या पहिल्या सत्रात आमदार मिटकरी बोलत होते. ते म्हणाले की, अधिवेशनाच्या तोंडावर तात्पुरत्या स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील खाती इतराकडे सोपवली, याचा अर्थ स्पष्ट आहे की मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. सरकारमध्ये हिंमत असेल तर जानेवारी महिन्यात तरी मंत्रिमंडळ विस्तार करून दाखवावा.

Amol Mitkari
Himachal Pradesh : सुखविंदर सिंग सुखू होणार नवे मुख्यमंत्री; थोड्याच वेळात होणार घोषणा

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर मारामारी होईल, हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ज्यावेळी होईल, त्यावेळी या सरकारमधील आमदारांची आमदारकी रद्द होणार आहे, असेही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले.

Amol Mitkari
Solapur Loksabha : सोलापूरच्या काँग्रेस नेत्यांचे अमोल मिटकरींनी वाढविले टेन्शन!

भाजपमध्ये सध्या मालकाला खूश करण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. त्याच माध्यमातून महाराष्ट्रातील महापुरुषांची बदनामी करण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे, असा आरोपही मिटकरी यांनी केला. भिक मागून मंत्रीपद मिळवता येते. मात्र, शाळा उभ्या करता येत नाहीत. शाळा या कष्टाने उभ्या कराव्या लागतात, असा टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

Amol Mitkari
Cabinet Expansion News : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात सावंत, देसाई, सत्तार यांच्यासह नऊ मंत्र्यांचे वाढले ‘वजन’!

सध्याचे सरकार अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिषाला हात दाखवतात, तर राफेल विमान आणताना चाकाखाली लिंब ठेवली जातात. चाळीस आमदार गुवाहाटीला जाऊन नवस बोलतात, त्यांनी बेळगावला जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी लढा द्यावा, असे खुले आवाहन मिटकरी यांनी केले.

आमदार रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्र ही आपली अस्मिता आहे. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाणे, यास आमचा विरोध आहे. एखाद्या राज्याची निवडणूक असेल तर त्या राज्यातील लोकांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रावर केला जाणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. राजकारणासाठी कोणीही आपला वापर करणार नाही, याची खबरदारी युवकांनी घेणे आवश्यक आहे. तसेच, थोर व्यक्ती, महाराष्ट्र, देश यांच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर युवकांनी शांत बसता कामा नये. सोशल मीडियावर असे विचार आल्यास त्यास जोरदार विरोध करणे आवश्यक आहे.

या वेळी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, हनुमंत कोकाटे, छाया पडसळकर, सचिन सपकळ, प्रताप पाटील, रेहना मुलाणी, प्रवीण डोंगरे, तुकाराम करे, दिलीप वाघमारे, धनंजय बब्रास, श्रीधर बाब्रस, बापूराव शेंडे, संदेश देवकर अभिजीत तांबिले नवनाथ रुपनवर, सागर मिसाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com