Eknath Khadse jalgaon Municipal Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse : युतीसाठी भाजप सोडून सगळे चालणार, एकनाथ खडसेंनी बैठक घेऊन घोषणाच करुन टाकली

Jalgaon Municipal Election : जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी एकनाथ खडसे यांनी कंबर कसल्याचे दिसत आहे. भाजप सोडून खडसे इतर कुणासोबतही युती करायला तयार आहेत.

Ganesh Sonawane

Jalgaon Politics : जळगाव शहर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने कंबर कसली आहे. त्यादृष्टीने मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवकांचे नुकतेच मोठे इनकमिंग भाजपमध्ये झाले. राष्ट्रवादी (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) दोन्ही भाजपसोबत युती करण्यास आग्रही आहे. मात्र भाजपविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी कंबर कसली आहे.

आगामी काळात होणाऱ्या जळगाव शहर महापालिका निवडणुकीत भाजप सोडून सर्वांशी युती करण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर केला आहे. बैठक घेऊन त्यांनी तशी घोषणा घोषणा केली आहे.

आमदार खडसे यांच्या निवासस्थानी शनिवारी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत खडसेंनी महाविकासआघाडीची भूमिका स्पष्ट केली. भाजप सोडून सर्वांशी युती करण्याचा निर्णय घेत एक वॉर्ड-एक चिन्ह या तत्त्वानुसार निवडणुका लढविल्या जातील, अशी माहिती खडसेंनी दिली.

बैठकीत महापालिकेसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना त्यांच्या ताकदीनुसार त्या-त्या प्रभागात व वॉर्डात एक प्रभाग एक चिन्ह यानुसार निवडणूक लढण्याच्या सूचना आमदार खडसे यांनी यावेळी केल्या.

शिवसेना-उबाठा पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महानगराध्यक्ष एजाज मलिक, कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, डॉ. रिझवान खाटीक, राजू मोरे, दुर्गेश पाटील, रहीम तडवी, किरण राजपूत, गोटू चौधरी आदी बैठकीला उपस्थित होते.

खडसेंच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीपासून महाविकास आघाडीतील घटक पक्ष कॉंग्रेस मात्र दुरच राहिला. काँग्रेसचा कुठलाही पदाधिकारी या बैठकीला हजर नव्हता. त्यामुळे कॉंग्रेसच्या भूमिकेविषयी चर्चांणा उधाण आले आहे.

गेल्या अडीच वर्षांत जळगाव शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटातील माजी नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्यासह डजनभर माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केल्याने भाजपची ताकद एकहाती वाढली आहे. त्यामुळे या निवडणुकीतही भाजपचे वर्चस्व राहण्याचीच शक्यता अधिक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT