Jalgaon Politics : बोगस कॉल सेंटर चालविल्याप्रकरणी सध्या नाशिक कारागृहातील न्यायालयीन कोठडीत असलेले जळगावचे माजी महापौर तथा शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान नगरसेवक ललित कोल्हे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कार विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांना ललित कोल्हे यांचा ताबा हवा असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महागड्या कार स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवीत मुंबईच्या तरुणाला गंडा घातल्याप्रकरणात मुंबई पोलिस त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात आपल्याकडे वर्ग करून घेणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सुतार चाळ परिसरात राहणारे आणि कार भाड्याने देण्याचा व्यवसाय असलेले कृष्णा धनाराम देवासी (२९) यांनी या संदर्भात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ६८ लाखाची कार ३८ लाख रुपयांत मिळवून देण्याचे सांगून ललित कोल्हे याने वाहन खरेदीसाठी १० टक्के आगाऊ रकमेची मागणी केली. २४ नोव्हेंबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत तक्रारदाराकडून स्वत:च्या तसेच राकेश चंदू अंगारीया व एका हॉटेलच्या खात्यावर एकूण १४ लाख ३९ हजार १०० रुपये वळते करून घेतले होते.
रक्कम दिल्यानंतर कृष्णा देवासी यांना काही काळ वाहन वितरणाबाबत आश्वासने देण्यात आली. मात्र, वाहन न मिळाल्याने आणि दिलेली रक्कमही परत न केल्याने देवासी यांना आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी कृष्णा देवासी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात २२ एप्रिल २०२५ रोजी ललित कोल्हेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोल्हे हा जळगावातील बोगस कॉल सेंटर प्रकरणात नाशिक कारागृहात असून मुंबई पोलिस त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात आपल्याकडे वर्ग करून घेणार आहेत. त्यासाठी मुंबई पोलिसांना कोल्हे यांचा ताबा हवा आहे. न्यायालयीन परवानगी मिळाल्यानंतर त्यांना या प्रकरणात अटक दाखल करून पुढील चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान एकीकडे बोगस कॉल सेंटर प्रकरणात कोल्हे हे आधीच अटकेत आहे असे असताना दुसरीकडे कार विक्रीतील कथित फसवणूक प्रकरण समोर आल्याने ललित कोल्हे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. या आर्थिक व्यवहारात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिस करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.