

Maharashtra Politics : भारतीय जनता पार्टीच्या नवीन प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून भाजपच्या या नव्या पॉवरफुल टीममध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवार (दि. २४) पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नवीन प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्रातील तब्बल ४३ जणांच्या नावाची यादी त्यांनी जाहीर केली. त्यात प्रत्येकाची विभागवार विविध महत्वाच्या पदांवर निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नियुक्त्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पाच जणांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रात भाजपचे अनेक दिग्गज नेते आहेत. अशा पार्श्वभूमीवर भाजपकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार मंगेश चव्हाण यांसारख्या दमदार नेत्यांची प्रदेश पातळीवरील नियुक्ती महत्वपूर्ण ठरते. याव्यतिरिक्त आणखी दोन चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे.
माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व माजी खासदार डॉ. सुजय विखे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. यातील भारती पवार यांचा आदिवासी व ग्रामीण भागातील राजकारणावर प्रभाव असल्याने त्यांची नियुक्ती महत्वाची ठरते. तर सुजय विखे यांचा युवा वर्गावर असलेला प्रभाव महत्वाचा ठरतो. तर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रदेश चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यानंतर जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव आहे.
याशिवाय जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांच्या कन्या भैरवी वाघ तसेच रोहिणी नायडू यांची प्रदेश चिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. नव्या प्रदेश कार्यकारिणीत उत्तर महाराष्ट्रातून केवळ या पाचच जणांना स्थान मिळाले आहे. मात्र, या पाचही जणांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याने उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ही महत्वाची बाब आहे.
भाजपा परिवारातील प्रत्येक कार्यकर्ता हा समर्पित भावनेने काम करतो. याच कार्यशैलीमुळे राज्यातील मायबाप जनतेच्या मनात भाजपा परिवाराने विश्वास संपादन केले आहे. या नियुक्तीमुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.