Pankaj Bhujbal : कांदानगरी लासलगावसाठी पंकज भुजबळ मैदानात ; अधिवेशनात राज्यमंत्र्याना थेट सवाल..उत्तरच मागितलं

Pankaj Bhujbal On Lasalgaon water issue : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र व आमदार पंकज भुजबळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लासलगावच्या पाण्याचा प्रश्न उपस्थितीत करत लक्षवेधी मांडली.
Pankaj Bhujbal
Pankaj BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज महाराष्ट्र विधान परिषद नियम १०१ अन्वये आमदार पंकज भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. त्यावरील उत्तरात पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उत्तर दिले.

जलजीवन मिशन रेट्रोफिटिंग योजनेअंतर्गत लासलगाव विंचूरसह १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २६.५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनेच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर लासलगाव विंचूरसह १६ गावांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जाईल. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतरही जर लासलगाव सारख्या मोठ्या शहरांना पाणी पुरवठा मुबलक प्रमाणात होऊ शकला नाही तर लासलगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल अशी माहिती पाणी पुरवठा राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.

आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ही आशिया खंडातील कांद्याची अग्रगण्य बाजारपेठ असून हे शहर झपाट्याने विकसित होत आहे. गेल्या १५ वर्षांत येथील लोकसंख्या तिपटीने वाढून ती ३० हजारांच्या वर गेली आहे. सध्या लासलगाव शहरासाठी १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी दिले जात आहे. लोकसंख्येच्या तुलनेत लासलगाव साठी अत्यंत अपुरे आहे. विविध तांत्रिक अडचणींमुळे हा पुरवठा वारंवार खंडित होत असतो. अनेकदा नागरिकांना काही दिवस पाण्याविना राहावे लागत लागते.

Pankaj Bhujbal
BJP News : भाजपच्या नव्या पॉवरफुल टीममध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या 'या' पाच नेत्यांचा समावेश, कुणावर काय जबाबदारी?

त्यामुळे जन सामान्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे लासलगाव शहरासाठी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शहरापासून १० कि.मी.अंतरावर असलेल्या 'खडक माळेगाव धरण' येथून स्वतंत्र जलवाहिनी टाकून नवीन पाणीपुरवठा योजना राबवणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली.

Pankaj Bhujbal
Jalgaon BJP Mayor : जळगावच्या महापौर झाल्या कडक शिस्तीच्या मॅडम, गेटवर उभे राहून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची घेतली शाळा

या लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, जलजीवन मिशन रेट्रोफिटिंग योजनेअंतर्गत लासलगाव विंचूरसह १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २६.५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनेच्या दुरुस्तीचे काम अतिंम टप्प्यात असून योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर लासलगाव विंचूरसह १६ गावांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे. मात्र तरी देखील लासलगाव सारख्या मोठ्या गावांचा विस्तार बघता पाणी पुरवठा मुबलक होऊ शकला नाही तर स्वतंत्र योजना राबविण्यासाठी शासन सकारात्मक विचार करेल. तसेच या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी लवकरच बैठक घेऊन मार्ग काढला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com